उन्हाळ्यातही घ्या पोहायची मज्जा, पालिकेच्या दादर, चेंबूर तरणतलावांमध्ये मिळणार प्रशिक्षण
मुंबईत उन्हाचा कडाका वाढला असताना मुलांबरोबर मोठ्यांनाही थंडा थंडा कुलकुल पाण्यात पोहण्याचे प्रशिक्षण घेता येणार आहे. मुंबई महापालिकेची 11 तरणतलाव असून दादर आणि चेंबूरमध्ये 21 दिवसांच्या प्रशिक्षणाची पहिली बॅच 21 एप्रिलपासून तर दुसरी बॅच 6 मेपासून सुरू होणार आहे. नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या नऊ जलतरण तलावांवर मासिक, त्रैमासिक मेंबरशिप द्यायला सुरुवात केली जाणार आहे.
मुंबईकरांना उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी मुंबई पालिकेच्या दादर (प.) येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव आणि चेंबूर (पू.) येथील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलावात 21 दिवसांचे पोहण्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. पहिला प्रशिक्षण वर्ग 2 मेपासून सुरू होणार आहे, तर दुसरा वर्ग 23 मेपासून होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नावनोंदणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीची लिंक सोमवार, 21 एप्रिल सकाळी 11 वाजेपासून महापालिका संकेतस्थळावर पाहून नावनोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर जलतरण तलावांवर मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा नव्याने उपलब्ध होणार आहे.
मासिक, त्रैमासिक सभासदत्व इथे मिळणार
दादर आणि चेंबूर वगळता इतर नऊ जलतरण तलावांमध्ये मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 21 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी 18001233060 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कांदिवली (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव, दहिसर (पश्चिम) येथील श्री भावदेवी कांदरवाडा जलतरण तलाव, दहिसर (पूर्व) येथील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील पालिका जलतरण तलाव, गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) येथील पालिका जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील पालिका जलतरण तलाव, वरळी येथील पालिका जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील पालिका जलतरण तलाव, वडाळा येथील पालिका जलतरण तलाव.
15 वर्षांपर्यंतची मुले, 60 वर्षांपुढील ज्येष्ठ, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी 2 हजार 210 रुपये तर 16 ते 60 वयोगटातील नागरिकांसाठी 3 हजार 310 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
दादर आणि चेंबूर येथील दोन्ही जलतरण तलावांमध्ये दररोज दुपारी 12.30 ते 1.30, दुपारी 2 ते 3.30 आणि दुपारी 3.30 ते 4.30 अशा तीन सत्रांमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रशिक्षणाच्या नोंदणीसाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा.
सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी 18001233060 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List