सलमानच्या घरी जशा गोळ्या झाडल्या, तशाच तुझ्या घरी… बिश्नोई गँगची आणखी एका अभिनेत्याला धमकी
सलमान खान नंतर आता एका टीव्ही अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर रुबीना दिलैकचा नवरा अभिनव शुक्ला आहे. धमकी देणारा स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगत आहे. सलमान खानच्या घरी जशा गोळ्या झाडल्या, तशाच गोळ्या तुझ्या घरी मारू, अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे. अभिनवला थेट इन्स्टाग्रामवरच ही धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये आसिम रियाजचाही उल्लेख करण्यात आला आहे.
अभिनव शुक्ला याला इन्स्टाग्रामवर अंकुश गुप्ता नावाच्या एका यूजर्सने मेसेज पाठवला आहे. मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस आहे. तुझ्या घराचा मला पत्ता माहीत आहे. ये का गोळया घालण्यासाठी. सलमानच्या घरी येऊ जशी गोळी घातली, तशीच तुझ्या घरी येऊन AK47ने गोळ्या घालेल. तुझ्या घरच्यांवर आणि होमगार्डच्या लोकांनाही गोळ्या घालू. 15 लोकं घेऊन येईन मुंबईत, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी
धमकावणारा आणखी काय म्हणाला?
तू किती वाजता कामावर जातो हे सुद्धा माहीत आहे. शुटिंगवर. तुला शेवटची वार्निंग देतोय. आसिमला चुकीचं बोलण्याच्या आधी तुझं नाव बातमीत येईल. लॉरेन्स बिश्नोई जिंदाबाद. बिश्नोई भाई आसिमच्या सोबत आहे, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. फिटनेस रिअॅलिटी शो बॅटग्राऊंडमधील वादानंतर अभिनव शुक्लाला हा मेसेज आला आहे.

Gupta Post
वादातून सुरू झालं प्रकरण
दरम्यान, बॅटलग्राऊंडच्या शुटिंग दरम्यान आसिम रियाज आणि अभिषेक मल्हान दरम्यान वाद झाला होता. रूबीना दिलैकने जेव्हा झगडा थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आसिम तिच्यावर प्रचंड भडकला. त्यानंतर रुबीनाचा नवरा अभिनवने आसिमला टोला लगावला होता. डोकं नसणं आणि वर्तण चुकीचं असणं ही खराब फिटनेसची निशाणी नाही. डोकं ठिकाण्यावर असणं आणि वर्तवणूक चांगली असणं फिटनेसचा खरा अर्थ असतो, असा टोला अभिनवने लगावला होता. त्यानंतर हे प्रकरण अधिकच तापलं. बॅटग्राऊंडमध्ये झालेल्या झगड्याला वादाचं रुप मिळालं. त्यानंतर आता आसिमच्या नावाने अभिनवला थेट जीवे मारण्याचीच धमकी मिळाली आहे.
अभिनवची पोस्ट काय
धमकीची पोस्ट आल्यानंतर अभिनवने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, असं त्याने म्हटलंय. पंजाब पोलिसांना टॅग करून तो म्हणतो, धमकी देणारा चंदीगड/मोहालीचा असल्याचं दिसतंय, असं सांगत त्याने कारवाईची मागणी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List