राज, उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत; गुणरत्न सदावर्तेंचा खोचक टोला, म्हणाले दोघेही करमणुकीचं साधण…
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले आहेत. यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे ही बातमी तयार करण्यात आली आहे, अभिनेते महेश मांजरेकरांकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवला आहे, एक बात कहूंगा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कन्फ्यूज, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे ही बातमी तयार करण्यात आली आहे, अभिनेते महेश मांजरेकरांकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवला आहे, एक बात कहूंगा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कन्फ्यूज. राजकारणात काय कौटुंबीक असते का? उध्दव ठाकरेंचं राजकारण भाईजानचं राजकारण आहे. राज ठाकरे गले मीलो म्हणत असतील तर, हे दोघेही करमणुकीचं साधण झाले आहेत, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे विधानसभेत एकही माणूस नाही, उद्धव ठाकरेंकडे किती लोक राहातील सांगता येत नाही. दोघांचे पक्ष हे गल्लीतील आहेत, गल्लीतून घरापर्यंत हे जातील. लोकांना टोल, ब्रिज सगळं समजलं आहे. हिंदी भाषेच्या फेल्युलर नंतर यांनी गले मीलो गले मीलो सुरू केलं आहे. राज ठाकरे यांचे लोकच याला अभद्र युती म्हणत आहेत. हिंदीचा विरोध फेल जाणार म्हणून महेश मांजरेकर यांच्या मार्फत नवीन प्रोडक्शन सुरू झालं आहे. दोघांचही काही राहीलं नाही, कागदावरची आयडीयॉलॉजी नाही, यांना राजकीय सल्ल्याची गरज आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
युतीचे संकेत
महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List