हिंगोली जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी शनिवार व रविवारी दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणी जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List