विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?
मुंबईमधील विलेपार्ले परिसरातील कांबळीवाडी येथील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ जैन मंदिर बुधवारी पाडण्यात आले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. या कारवाईमागील कारणही स्पष्ट झाले. त्यानंतर देशभरातील जैन समुदाय नाराज झाला. मंदिर पाडल्याच्या विरोधात आज, शनिवारी सकाळी निषेध अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव, संत आणि राजकीय मंडळी सहभागी झाली होती.
काँग्रेस खासदार आक्रमक
इतके जुने जैन मंदिर पाडण्यावरून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला. “त्यांची मागणी काय आहे? ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली, त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. ही मागणी योग्य आहे. सकाळी दोन जेसीबी आणले, महिलांवर हल्ला झाला. याचा सगळेजण निषेध करतायत. जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. आजपर्यंत त्यांचा कधी आवाज ऐकला होता का? आज का उतरावं लागलं त्यांना?” असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारला.
चुकीच्या पद्धतीने मंदिर पाडण्यात आल आहे. त्यामुळे जैन मंदिर जिथे होत त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावं. हे हिंदुत्ववादी सरकार आहे ना? मग मंदिर कसे तोडले जात आहेत हा सवाल आहे? तुमची सत्ता सगळीकडे आणि कारवाई मात्र मंदिरावर डबल इंजिनच्या सरकारने ही मंदिरावरील तोडक कारवाई केली आहे, असे त्या म्हणाल्या.
भव्य मंदिर उभारणार
दरम्यान या सर्व घटनेनंतर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी पुढील घडामोडींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली या बैठकीत ठरलं की,ज्या ठिकाणी मंदिर होत त्या ठिकाणी साफसफाई करण्यात येईल आणि मूर्तीची स्थापना करून पूजा करण्यात येईल. ज्या हॉटेल मालकीच्या दबावाखाली हे मंदिर तोडण्यात आल आहे त्या हॉटेल मालकच्या अनधिकृत बांधकामाला नोटीस देण्यात येणार आहे. तर यापूर्वी जिथं मंदिर होतं, तिथं पुन्हा त्याच दिमाखात बांधलं जाईल, अशी माहिती आमदार पटेल यांनी वॉर्ड अधिकाऱ्याशी झालेल्या बैठकीनंतर दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List