मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात तब्बल 232 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवरच समाधान मानावलं लागलं. दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे, महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. याचा सर्वात मोठा फटका बसला आहे, तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर इतर पक्षात होणारे पक्षप्रवेश हे ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरत आहेत. आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दोन बडे नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
माजी मंत्री उत्तम खंदारे, माजी आमदार शिवरन पाटील, दोन जिल्हाप्रमुख आणि एक सहसंपर्कप्रमुख आज ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे. उत्तम खंदारे आणि शिवरन पाटील यांच्यासोबतच बुलढाणा, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते संजय जाधव, भावना गवळी आणि आमशा पाडवी यांची देखील उपस्थिती असणार आहे.
ठाकरेंना मोठा धक्का
दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List