IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
Ranya Rao Arrest: बंगळुरू विमानतळावर 12.56 कोटी रुपयांच्या सोन्यासह कन्नड अभिनेत्री रान्या राव (33) हिला अटक करण्यात आली. तिच्या घरातून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 2.67 कोटी रुपयांची रोकड आणि 2.07 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. रान्या राव ही कर्नाटक कॅडरचे वरिष्ठ IPS अधिकारी आणि पोलीस महासंचालक (राज्य पोलीस हाउसिंग कॉरपोरेशन, डीजीपी) यांची सावत्र मुलगी आहे.
रान्या राव एका वर्षात 30 वेळा तस्करीसाठी दुबईला गेली होती. एक किलो सोन्याची तस्करी करण्यासाठी तिला एक लाख रुपये मिळात होते. दुबईला गेल्यावर तिला जवळपास 13 लाख रुपये मिळात होते. ती स्मगलिंगसाठी मॉडिफाईड जॅकेट आणि स्पेशल बेल्टचा वापर केला. बॉलीवूड चित्रपटाच्या स्टाईलने ती तस्करी करत होती. डीआरआयच्या पथकाने रान्या राव हिच्या घराची झडती घेतली. रान्या तिच्या पतीसोबत त्या ठिकाणी राहते.
कोण आहे रान्या राव
रान्या ही कन्नड आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. ती डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्याचे लग्न चार महिन्यांपूर्वी जतिन हुक्केरी याच्याशी झाले. या 32 वर्षीय रान्या हिला अटक केल्यानंतर कोर्टात उभे करण्यात आहे. न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बेंगळुरू विमानतळावरुन कार्यरत असलेल्या एका मोठ्या तस्करीच्या टोळीचा ती एक भाग असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.
काय म्हणतात डीजीपी रामचंद्र राव
रामचंद्र राव सध्या कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुलीच्या अटकेनंतर त्यांनी मौन सोडले. के.रामचंद्र राव म्हणाले, अनेक दिवसांपासून माझी मुलगी माझ्या संपर्कात नाही. ती आमच्या सोबत राहत नाही. ती तिच्या पतीसोबत राहते. या प्रकरणात कायदा आपले काम करणार आहे. आयपीएसच्या नोकरीत आजपर्यंत आपल्या कारकिर्दीत कोणताही धब्बा लागला नाही. या प्रकरणात यापेक्षा मी अधिक काही बोलू इच्छित नाही, असे रामचंद्र राव यांनी सांगितले.
On his daughter Ranya Rao, arrested by DRI for allegedly smuggling gold from Dubai, Ramachandra Rao, DGP of Karnataka State Police Housing Corporation, says, "Ranya got married to Jatin Hukkeri 4 months ago. She never came to our house after the marriage. We are completely…
— ANI (@ANI) March 6, 2025
अनेक तपास संस्था तस्करीत रान्या रावच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. या प्रकरणात तिचा सहभाग किती मोठा आहे आणि तिचा कोणत्याही मोठ्या संघटित टोळीशी संबंध आहे का, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List