‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन

‘झोमॅटो’ची ‘वुमन्स डे’ निमित्त मोठी भेट, पहिल्या महिला रायडिंग सेंटरचे उद्धाटन

अनेकदा घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये मोबाईल किंवा अॅपवरुन खाद्यपदार्थ मागविण्यासाठी झोमॅटो हे लोकप्रिय ठरले. झोमॅटोद्वारे तुम्हाला तुमचे जेवण अगदी सहज घरपोच मिळते. झोमॅटोने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक गुडन्यूज दिली आहे. मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगरानी यांच्या हस्ते मुंबईतील झोमॅटोच्या पहिल्या ‘महिला रायडिंग सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. या रायडिंग सेंटरद्वारे महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे आता महिलाही झोमॅटोद्वारे जेवण वितरण करताना दिसणार आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगरानी यांच्या हस्ते मुंबईतील झोमॅटोच्या पहिल्या ‘महिला रायडिंग सेंटर’चे उद्घाटन पार पडले. या केंद्राचे उद्दिष्ट महिलांची गतिशीलता आणि उपजीविकेच्या संधी वाढ करणे असा आहे. झोमॅटो मुंबई आणि अहमदाबादसह विविध शहरांतील केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण सुलभ करणार आहे.

महिलांसाठीच्या उपजीविकेसाठी उपक्रम सुरु

झोमॅटोने सुरु केलेला हा उपक्रम महिलांसाठीच्या उपजीविकेसाठीचा कार्यक्रमाचा भाग आहे. या उपक्रमाचा मूळ उद्देश लिंगभेद दूर करणे आणि लॉजिस्टिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधी देऊन त्यांना सक्षम करणे असा आहे. या झोमॅटो संलग्न कंपन्यांमधील भूमिकांसाठी १०,००० महिलांना प्रशिक्षण देणे हे उद्दिष्ट असणार आहे.

झोमॅटोचे ध्येय काय?

झोमॅटोची स्थापना २०१० मध्ये सुरु झाली. अधिकाधिक लोकांसाठी चांगले अन्न देणे हे झोमॅटोचे ध्येय आहे. झोमॅटो हे असे अॅप आहे, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट मधून घरबसल्या जेवण मागवता येत आहेत आणि झोमॅटो तुम्हाला ते घरपोच आणून देते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महिला दिनानिमित्त एमपॉवरचा धक्कादायक अहवाल, मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त महिला दिनानिमित्त एमपॉवरचा धक्कादायक अहवाल, मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त
महिलांचे मानसिक आरोग्य गंभीर संकटात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार, भारतात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ३६.६ टक्के आहे....
संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर लेक पहिल्यांदाच बोलली…, तुम्हालाही अश्रू नाही आवरणार
सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, सहा तासांत रुग्णवाहिका आली नाही…रुग्णाने सोडले प्राण
बेघर मुंबईकरांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, मिळणार हक्काचं घर!
Video: तुम्ही निघा!; अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना सर्वांसमोर स्टेजवरून उतरवले खाली
जयकुमार गोरेने मला दंडवत घातला म्हणून चांगुलपणाच्या भावनेतून केस मागे घेतली, पण आता…; पीडित महिलेचा इशारा
TB रुग्णांसाठी Meropenem इंजेक्शन महानगरपालिका, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत द्यावीत, सुनील प्रभू यांची मागणी