चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पाने शेती धोक्यात; जमीन झाली नापीक

चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पाने शेती धोक्यात; जमीन झाली नापीक

चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक जमीन नापीक झाल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे पुन्हा एक नवीन युनिट इथे सुरू झाले आहे. गडचांदूर शहरात हा प्रकल्प असून, आजूबाजूला थुटरा आणि गोपालपूर या गावांची शेती आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही महत्वाची पिके इथे घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून शेती करणे कठीण होत आहे. सिमेंट प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धूळीमुळे जमीन नापीक झाली आहे.

दिवसरात्र या प्रकल्पात सिमेंट उत्पादन सुरू असते. त्यामुळे प्रकल्पाच्या चिमण्यातून सारखी धूळ बाहेर पडते आणि ती आजूबाजूच्या गावात आणि शेतपिकांवर पडते. याशिवाय प्रकल्पातून जे दूषित पाणी बाहेर सोडले जाते त्यात सिमेंटचे प्रमाण असल्याने शेतीचा पृष्ठभाग कडक झाला असून, धुळीने काळी माती पांढरी झाली आहे. या प्रदूषणाचा मोठा परिणाम पिकांवर आणि जमिनीवर झाला आहे. सोबतच आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जे काही पीक घेतले जाते, त्याचे उत्पादन घटले आहे. शिवाय गुणवत्तेवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे. शेतात कितीही मेहनत घेतली तरी हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

या प्रदूषणामुळे सुमारे शंभर हेक्टरवर शेती बाधित झाली आहे. शेतात आणि पिकांवर धुळीचे प्रमाण एवढे आहे की, शेतमजूरसुद्धा इथे काम करायला तयार नाहीत. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकल्पाकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यापेक्षा कंपनीने आमची जमीन घेऊन मोबदला द्यावा, अशी मागणी ते करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अँड दि ऑस्कर गोज टू…या १० चित्रपटांना नामांकन,केव्हा आणि कुठे पाहायचा सोहळा अँड दि ऑस्कर गोज टू…या १० चित्रपटांना नामांकन,केव्हा आणि कुठे पाहायचा सोहळा
हॉलीवूडचा ऑस्कर पुरस्कार सोहळा – २०२५ साजरा होत आहे. जगभरातील सिनेमाप्रेमींच लक्ष या अवॉर्ड फंक्शनवर लागली आहे. साल २०२५ मध्ये...
निर्लज्जपणाची हद्द, मिंधेंच्या शाखेत चक्क दारुपार्टी! व्हिडीओ व्हायरल
अजितदादांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं? ‘तो’ Video समोर
सुरुवात ठाण्यातून झाली आता इतिहासही…, राऊतांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून हल्लाबोल
‘Chhaava’ च्या आधी या अभिनेत्यांना लकी मॅस्कॉट ठरल्या या हिरोईन, बॉक्स ऑफीसवर पैशांचा पाऊस
IND vs NZ Champions Trophy 2025 – टीम इंडियाने किवींना लोळवले; 44 धावांनी दणदणीत विजय
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे आरोपी मिंधे गटातले? ऑडियो क्लिप व्हायरल