श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात कोणी पाठवला? परदेशातून भारतात पार्थिव आणण्याची काय आहे प्रक्रिया?

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात कोणी पाठवला? परदेशातून भारतात पार्थिव आणण्याची काय आहे प्रक्रिया?

Sridevi: 2018 मध्ये श्रीदेवी यांच्या निधनाची माहिती समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला. दुबईत एका लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचं अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला. आज श्रीदेवी यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील त्यांच्या अनेक आठवणी सिनेमांच्या माध्यमातून जिवंत आहेत. श्रीदेवी यांचं निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव भारतात येईल का? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला होता. यावेळी एका व्यक्तीने अभिनेत्रीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबियांची मदत केली होती.

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात आणण्यासाठी अशरफ थामारास्सेरी यांनी मदत केली होती. कुटुंबियांच्या वतीने अशरफ यांनीच अभिनेत्रीचा मृतदेह दुबईतील अधिकाऱ्यांकडून घेतला होता. अशरफ यांनी श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात पाठवला होता. अशरफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अशरफ हे मूळचे केरळचे असून सध्या अरब अमिरातीतील अजमान येथे राहतात.

अशरफ यांनी फक्त श्रीदेवी यांचाच नाही तर, अन्य अनेक पार्थिव देखील त्यांच्या नातेवाईकांपर्यंत मोफत पोहोचवले आहेत. पण दुसऱ्या देशात आपल्या देशात पार्थिव आणण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. शिवाय काही कागदपत्रांची देखील गरज भासते.

काय आहे पूर्ण प्रक्रिया?

– कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटलमधून मृत्यू घोषणा पत्र घ्यावं लागतं आणि त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात सांगवं लागते. त्यानंतर दुबई पोलिस ना हरकत प्रमाणपत्र जारी करतात आणि मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं जातं. त्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे पुढील प्रक्रिया ठरवावी लागते. या मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारणही लिहिलेलं असते.

– मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्हिसा किंवा लेबर कार्डबाबत काम करावं लागतं. या प्रक्रियेत, कामगार मंत्रालय आणि इमिग्रेशन विभागाकडून मृत व्यक्तीचा व्हिसा किंवा लेबर कार्ड रद्द करावं लागतं.

व्हिसा रद्द झाल्यानंतर, मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कार्गो बुकिंग करावं लागतं. कार्गो बुकिंगची प्रक्रिया झाल्यानंतर, एअरलाइनला कन्फरमेशन लेटर सोबत हॉस्पिटलशी संपर्क साधावा लागतो, जेथे एम्बॅलिंग प्रमाणपत्र आणि विमानतळाला ना हरकत पत्र दिले जाते. व्यक्ती व्हीआयपी असल्यास प्रक्रिया वेगळी असू शकते.

– या तीन कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा लागतो. मृत्यूची नोंद झाल्यानंतर, भारतीय दूतावास मृत्यू प्रमाणपत्र जारी करते आणि मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करते.त्यासोबत वैद्यकीय कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर मृतदेह विमानतळावर नेण्याचे पत्र दिले जाते.

यावेळी कोणत्या कागदपत्रांची भासते गरज…

– मेडिकल रिपोर्ट

– मृत्यू प्रमाणपत्र

– पोलीस रिपोर्ट (इंग्रजी भाषांतर आवश्यक)

– पासपोर्ट आणि व्हिजा कॉपी

– अन्य कागदपत्र

सांगायचं झालं तर, ही प्रक्रिया प्रत्येक देशाच्या स्थानिक नियमांच्या आधारे बदलली जाऊ शकते आणि त्या आधारावर प्रक्रिया पूर्ण केली जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ  एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ 
अभिनेत्री तथा युट्यूबर प्राजक्ता कोळी 13 वर्षांच्या रिलेशनला अखेर लग्नबंधनात अडकवलं आहे. प्राजक्ताने प्रियकर वृषांक खनालसोबत 25 फेब्रुवारी रोजी लग्न...
सलीम खान पासून शंकर कसे झाले सलमान खान याचे वडील, नावात कोणी आणि का केले बदल?
‘छावा’च्या नावावर आणखी एक विक्रम, आता काय घडलं? थेट…
मन्नतमध्ये काही बदल करण्याआधी शाहरूखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी; आहे खास कारण
Govinda – Sunita Ahuja : कोई माई का लाल…घटस्फोटाच्या चर्चानंतर सुनीता अहुजाची पहिली प्रतिक्रिया
मोदी, मिंध्यांकडून पोलीस भरतीचे गाजर; आश्वासने नकोत, वेळापत्रक तयार करा; उमेदवारांची मागणी
तानाजी यांनी सर केला 1800 फूट कोकणकडा