‘द ग्रेट इंडियन शो’मध्ये कपील शर्माचं मानधन ऐकून उंचावतील भुवया, अन्य कलाकारांच्या फिचा आकडा समोर
The Great Indiyan Show: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या कॉमेडी शोला चाहत्यांनी कायम डोक्यावर घेतलं. टीव्हीवर कपिलचा कॉमेडी शो प्रसारित झाला आणि त्याने चाहत्यांच्या मनावर आणि टीव्हीवर राज्य केलं. त्यानंतर कपिल याने ओटीटी प्लॅटफॉर्म देखील पदार्पण केलं. तिथे देखील कपिल शर्माला यश मिळालं. नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन’ कपिल शर्माचे दोम सीझन प्रदर्शित झाले आहेत. आता तिसऱ्या सीझनची देखील घोषणा करण्यात आली आहे.
तिसऱ्या सीझनमध्ये कपिल शर्मा याच्यासोबत पुन्हा सुनिल ग्रोवर याला पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. पण यासाठी दोघांनी किती पैसे घेतले आहेत.. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आता कपिल, सुनिल आणि शोमधील इतर कलाकारांच्या फीचा आकडा देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘द ग्रेड इंडियन कपिल शो’ साठी कपिल शर्मा याला पाच एपिसोडचे पैसे देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कपिल शर्मा याला पाच एपिसोडसाठी 1 – 2 नाही तर, तब्बल 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. म्हणजे कपिल कपिलच्या एका आठवड्याचं मानधन 5 कोटींपेक्षा अधिक आहे.
एवढंच नाही तर, सुनिल ग्रोवर याचं मानधन देखील तगडं आहे. सुनिल ‘द ग्रेड इंडियन कपिल शो’ च्या एका एपिसोडसाठी तब्बल 25 लाख रुपये मानधम घेतो. कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर यांच्याशिवाय, अर्चना पूरन सिंग आणि कृष्णा अभिषेक प्रत्येकी एक एपिसोडसाठी 10 लाख रुपये मानधन घेतात.
राजीव ठाकूर याला एक एपिसोडसाठी 6 लाख रुपये मानधम देण्यात येतं. तर कीकू शारदा याचं मानधन 7 लाख रुपये आहे. सध्या सर्वत्र कपिल शर्मा शोची चर्चा रंगली आहे. चाहत्यांमध्ये देखील ‘द ग्रेड इंडियन कपिल शो’ चा बोलबाला असतो. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील शोचे छोटे छोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List