हा पांढरा पदार्थ आहे खूपच चमत्कारी, पाण्यात मिसळून प्या; आजारांना टाटा-बाय बाय करा
निरोगी शरीरासाठी तुमच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. निरोगी शरीरासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासाठी किंवा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी दररोड नियमित पाण्याचे सेवन करणे गरजेचे असते. तुमच्या शरीरामध्ये 70% पाणी असते. त्यामुळे दिवसभरामध्ये 7-8 लिटर पाणी पिणे गरजेचे असते. नियमित पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होणार नाहीत. पाणी प्यायाल्यामुळे तुमच्या त्वचे संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. नियमित पाणी प्यायल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
अनेकजण दररोज सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाण्यामध्ये मध किंवा अन्य पदार्थ मिसळून त्याचे सेवन करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? कोमट पाण्यात मीठ मिसळून प्यायाल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तुम्ही जर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये चिमुटभर मीठ मिसळा आणि तुमच्या आरोग्याला नेमकं काय फायदे होतात चला जाणून घेऊया. मीठ आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. कोण्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये मीठ वापरले जाते.
हायड्रेटेड शरीर – दररोज सकाळी थोडे मीठ मिसळून कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहते. मिठाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात असतात. दररोज मीठाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राहाते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण अनेकदा गरजेपेक्षा खूपच कमी पाणी पितो. अशा परिस्थितीत, दिवसभर शरीरात हायड्रेशन ठेवण्यासाठी सकाळी मीठ पाणी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
हाडांना ताकद मिळते – मीठामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे निरोगी राहातात. सकाळी नियमितपणे मीठ मिसळून कोमट पाणी प्यायल्याने शरीराची हाडे आणि स्नायू मजबूत होतात. ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांच्यासाठी सकाळी मीठचे पाणी पिणे हा एक रामबाण उपाय मानला जातो.
चमकदार त्वचा – सकाळी कोमट पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढले जातात, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून आराम मिळतो. मूत्रपिंड आणि यकृत देखील निरोगी होतात. यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडल्याने त्वचा देखील चमकदार होते. सकाळी नियमितपणे मीठाचे पाणी पिल्याने मुरुमे, सोरायसिस आणि एक्झिमाची लक्षणे कमी होतात. मीठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होतात.
पचनक्रिया सुधारते – सकाळी मीठ पाणी पिल्याने पचनशक्ती देखील मजबूत होते. मिठाचे पाणी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. मीठाचे पाणी शरीराच्या पीएच पातळीला देखील संतुलित करते. ज्या व्यक्तीला पोटात बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तची समस्या आहे आणि अन्न पचण्यास त्रास होत आहे त्यांनी सकाळी नियमितपणे मीठ मिसळलेले कोमट पाणी प्यावे. जेव्हा पचनशक्ती सुधारते तेव्हा शरीराची चयापचय क्रिया वाढते आणि लठ्ठपणा देखील हळूहळू कमी होऊ लागतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List