Sanjay Raut : एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस – संजय राऊत कडाडले

Sanjay Raut : एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस – संजय राऊत कडाडले

महायुतीच्या नेत्यांमध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी मला शहाणपणा शिकवू नये. एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ट मित्र आणि सहकारी होते. पण काय कराव, काय नाही हा शहाणपणा त्यांनी मला शिकवू नये. जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झावलं, त्या सरकारचे ते प्रमुख होते. संपूर्ण न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन सरकार टिकवलं आहे. तुम्ही प्रामाणिकपणे नव्हे तर पैशाच्या बळावर, खोटी कामं करून निवडणूक जिंकली आहेत, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर कडाडून हल्ला चढवला.

बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात घरगड्यासारखी वागणूक दिली गेली असा आरोप करत म्हणून उठाव केल्याचं विधान एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्यावरही राऊतांनी सडेतोड उत्तर दिलं. एकनाथ शिंदेनी उठाव वगैरे काही केला नाही, ते ईडीला, सीबीआयला घाबरून पळालेत. ते जर घरगडी असते तर त्यांना आमदार केलं असतं का ? तर त्यांना इतकी वर्ष मंत्रीमंडळात महत्वाची खाती दिली असती का ? घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं महत्वाचं खातं मुख्यमंत्र्यांनी दिलं असतं का ? असा सडेतोड सवाल राऊत यांनी उपस्थित केला

मुख्यमंत्री हे कधीच नगरविकास खातं सोडत नाही, फडणवीसांकडे पहा, त्यांनी सोडलं का ? पण जे नगरविकास खातं मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे, ते उद्धव ठाकरे यांनीत्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्याला म्हणजे एकनाथ शिंदेंना दिलं, एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे, असा घणाघाती हल्ला राऊत यांनी केला.

राजन साळवींसारखे लोक हे गांडू

सत्ता गेल्यावर जो माणूस तडफडत राहतो, त्याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाहीत. राजन साळवी स्वत:ला कडवट शिवसैनिक म्हणत होते, पण ते तसे नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे अनेक काळ सत्तेशिवाय राहिले, त्यांच्यासोबत आम्हीही सगळे सत्तेशिवाय राहिलो. आम्ही कधी आमदार,खासदार होऊ असं आम्हाला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यातला बराच काळ सत्तेशिवाय काढला. आम्हाला सत्ता फार उशीरा मिळाली. आमच्याकडे सत्ता नसतानासुद्धा मा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलो आणि यापुढेही राहू. सत्ता हे सर्वस्व नाही, राजन साळवींसारखे लोक आहेत, त्यांना आम्ही गांडू म्हणतो, अशा शब्दांत राऊतांनी साळंवीवर टीकास्त्र सोडलं.

संकटकाळात नेत्यासोबत, पक्षासोबत राहिलं पाहिजे, तुमचे पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील. पक्ष सोडून जाण्याची तुम्ही काहीही कारणं देत आहात. शिवसेना या चार अक्षरांमुळे तुमची राजन साळवी म्हणून किंमत आहे. तुम्हाला पक्षाने नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार केलं नसतं, तर कोण राजन साळवी ? तुम्हाला कोणी ओळखलं असतं ? ते काय किंवा इतर कोणीही काय, अगदी मी , संजय राऊत यांची ओळख काय ? आमच्यामागे शिवसेना ही चार अक्षरं आहेत म्हणून आम्ही आहोत. हे नालायक लोकं आहेत, असा हल्ला राऊतांनी चढवला.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चल...
वनप्लस ते मोटोरोला पर्यंत! 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, राज ठाकरेंबद्दल म्हणाला…