‘मला फडणवीसांनी शस्त्र हातात घेण्याची परवानगी द्यावी, मी गेल्या जन्मी…, बिचकुले राहुल सोलापूरकरवर प्रचंड संतापले
अभिनेता राहुल सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्याच्यावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकरला इशारा दिला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या इशाऱ्यानंतर आता अभिजित बिचुकले यांनी देखील राहुल सोलापूरकर याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘राहुल तुझ्यातील टकलू हैवान जागा झालेला दिसतोय, त्या टकलू हैवानाचा बंदोबस्त करायला अभिजीत बिचुकले जेम्स बॉण्ड झाला तर तुला महागात पडेल.’ असं अभिजित बिचकुले यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बिचकुले?
‘राहुल तुझ्यातील टकलू हैवान जागा झालेला दिसतोय, त्या टकलू हैवानाचा बंदोबस्त करायला अभिजीत बिचुकले जेम्स बॉण्ड झाला तर तुला महागात पडेल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या देशात जर कोणी बोलत असेल तर मी देवा भाऊंना सांगू इच्छितो फाशी द्यायला जसा जल्लाद असतो तसा मला परवाना द्या. महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केलं, तर मी त्यांचा शिरच्छेद करील, मला परवाना द्या.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री शिवेंद्र राजे यांच्यावर देखील टीका केली आहे. राहुल सोलापूरकरला शिवेंद्रराजे आवजाव बोलतात त्यांना मंत्रिपद जाण्याची भीती आहे का? असा सवाल यावेळी बिचकुले यांनी केला आहे. जयंतराव पाटील मागे बोलले होते मंत्रिपदाचा तुकडा मिळाला की शिवेंद्र राजे तिकडे जातात. शिवेंद्रराजे सरकारमध्ये शिपाई आहेत का? की मंत्री आहेत. शिवेंद्रराजेंनी देवा भाऊंच्या तोंडावर राजीनामा फेकावा. देवेंद्र फडणवीस परमिशन देणार असतील तर मी शस्त्र हातात घेईल, मी गेल्या जन्मी राजा होतो.
दरम्यान दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर बिचकुले यांनी कोकाटे यांना देखील सुनावलं आहे. त्यांनी जर शेतकऱ्यांचा अपमान केला असेल, तर मी त्याचा खरपूस समाचार घेणार असं बिचकुले यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List