योगेश कदम यांचे विधान बालिशपणाचे… काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांनी दाखवला आरसा
पुणे स्वारगेट येथील शिवशाही एसटीबसमध्ये एका महिलेवर झालेल्या बलात्काराने खळबळ उडाली आहे. या संदर्भात मंत्री योगेश कदम यांचे विधान आश्चर्यकारक आहे. परंतु योगेश कदम हे तरुण मंत्री आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या माहितीनुसार ते बोलले असतील. परंतु काहीच प्रतिकार झाला नाही असे म्हणण्यापेक्षा त्या मुलीवर आरोपीने प्रचंड दबाव टाकून अत्याचार केला असेल.परंतु अत्याचारापेक्षा कुठलीही मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्राधान्य देणार, त्यामुळे प्रतिकार झाला नसेल असे वक्तव्य काय झाडी, काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.
तर ठाकरे यांचे पाप धुऊन गेलं असतं
सोनिया गांधी आणि शरद पवार यांना घाबरून उद्धव ठाकरे प्रयागराजला गेले नाहीत. ‘हिंदू’ हा शब्द उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. खरंतर प्रयागराजलाच स्नानासाठी उद्धव ठाकरे यांनी जायला पाहिजे होते. त्यामुळे 2019 साली फडणवीस यांच्या पाठीत खूपसलेल्या खंजिराचं त्याचं पाप धुऊन गेलं असतं असा टोला शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.संजय राऊतला कुठेही उठता, बसता, झोपता फक्त राजकारण दिसतं. समाजाचं हित या माणसाला दिसत नाही. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून झाल्या असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता यावर प्रतिक्रीया देताना शहाजी बापू पाटील बोलत होते.
बालिशपणाचे वक्तव्य
मंत्री संजय सावकारे यांचं विधान आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे, कोणतीही महिला ही कोणाचीतरी माता आहे, बहीण आहे, मुलगी आहे. या सृष्टीची तारणहार तीच आहे अशा महिलांविषयी सर्वांनी आदर बाळगला पाहिजे असे विधान करणे गैर असल्याचे मत शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले. मंत्री योगेश कदम यांचे विधान आश्चर्यकारक आहे. परंतु योगेश कदम हे तरुण मंत्री आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते बोलले असतील परंतु काहीच गोंधळ झाला नाही असे म्हणण्यापेक्षा त्या मुलीवर आरोपीने प्रचंड दबाव टाकून अत्याचार केला असेल. परंतु अत्याचारापेक्षा कुठलीही मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्राधान्य देणार असे वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. मंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य बालिशपणाचे असले तरी या प्रकरणात ते आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे असेही ते म्हणाले.
बुद्धी भ्रष्ट झालेला माणूस
राजकारणातील बुद्धी भ्रष्ट झालेला माणूस म्हणजे संजय राऊत, संजय राऊत याने आता आपल्या खासदारकीची काळजी करावी पुन्हा आयुष्यात आमदारही नाही आणि खासदारही नाही त्यामुळे निवांत आता नारळाच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसावे असा टोला शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.निवडणुकीत नेमकं कुणी कुणाचा प्रचार केला हे उमेदवाराला ही समजत नाही आपला प्रचार कोण करतय आणि विरोध कोण करतय आणि संजय राऊत हा बुद्धी भ्रष्ट झालेला मुंबईत बसून पुण्यातली प्रचार यंत्रणा कशी दिसायला लागली हा महाभारतातला संजय आहे का असं वाटण्यासारखं विधान संजय राऊत करीत आहे. गुवाहाटीला जाऊन केलेला उठाव आणि त्या उठावाला मिळालेले जागतिक पातळीवरचं यश हीच संजय राऊत याची पोटदुखी झाली आहे.
अजित पवार योग्य वेळी निर्णय घेतील
वाल्मीक कराड याचे जेलमध्ये लांगून चालन होत असेल तर ही गंभीर बाब आहे, जेलमधील आरोपींना सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. राजकारणात संबंध कोणाचे कोणाशीही असू शकतात. सुरेश धस आणि वाल्मीक कराड याचे संबंध असू शकतात परंतु वाल्मीक कराड याच्या घाणेरड्या कृत्यांना सुरेश धस यांचा पाठिंबा असेल असे आपण म्हणू शकत नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांचा आहे आणि ते निश्चितपणे योग्य वेळी तो निर्णय घेतील असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List