मालवाहू आयशर टॅम्पो -दुचाकीचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

मालवाहू आयशर टॅम्पो -दुचाकीचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून जाणार्‍या 361 राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर बुधवारी रात्री 11.30 वाजता मालवाहू आयशर टॅम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची अहमदपूर पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील हगदळ येथील पवन भानुदास डुरे (वय 30, रा. हगदळ ता. अहमदपूर) व रणजित चंद्रकांत मुंढे (वय 24, रा. हगदळ ता. अहमदपूर) हे दोन युवक काही कामानिमित्त दुचाकीवर शिरूर ताजबंद येथे गेले होते. तेथील आपले काम आटपून शिरूर ताजबंद येथून गावातून ते हॉटेल शिवनेरी समोरून लातूरकडे जाणार्‍या 361 राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरून महामार्गावर लातूरकडे जात होते. लातूरकडून नांदेडकडे येत असलेला मालवाहू आयशर यांची समोरासमोर रात्री 11.30 वाजता धडक झाली. यात दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात एवढा भयंकर होता की आयशर टॅम्पोने धडक दिल्यानंतर दुचाकी फरपटत जात असताना घर्षण होऊन पेट घेतला. त्यात दुचाळी संपूर्ण जळून खाक झाली असून, आयशर टॅम्पो पलटी खाऊन बाजूच्या रोडवर जाऊन पडला. या अपघाताची घटना अहमदपूर पोलिसांना समजताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतांचे शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर हगदळ येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची अहमदपूर पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चल...
वनप्लस ते मोटोरोला पर्यंत! 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, राज ठाकरेंबद्दल म्हणाला…