थोडक्यात बातम्या : तीन वर्षे एलएलबी सीईटी तारखेत बदल

थोडक्यात बातम्या : तीन वर्षे एलएलबी सीईटी तारखेत बदल

तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाकरिता राज्यात आणि राज्याबाहेर 20 आणि 21 मार्च 2025 रोजी होऊ घातलेल्या प्रवेश परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 3 आणि 4 मे 2025 रोजी होईल, अशी माहिती राज्याच्या सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या तारखा क्लॅश होत असल्याने सीईटी सेलने आपली सीईटी मार्चऐवजी मे महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जेईई-मेनमध्ये 12 सदोष प्रश्न वगळले

आयआयटीसारख्या देशभरातील प्रतिष्ठत तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱया जेईई-मेन या परीक्षेत 12 सदोष प्रश्न विचारण्यात आल्याने ते वगळावे लागले आहेत. गेल्या वर्षी नीट-यूजीत उद्भवलेल्या घोळानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) व्श्वासार्हता गमावल्याची चर्चा सुरू झाली. त्यात आता जेईई-मेनमधील सदोष प्रश्नांमुळे पुन्हा एकदा एनटीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वर्षातून दोन वेळा जेईई-मेन घेतली जाते. त्यातील पहिल्या परीक्षेचा निकाल 11 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला. परीक्षेला 12.58 लाख विद्यार्थी देशभरातून बसले होते. त्यापैकी 14 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवण्याची कामगिरी केली आहे.

समय रैना आणि रणवीरला समन्स

आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हास्य कलाकार समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. 17 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहावे असे सांगण्यात आले आहे. इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमात यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाने महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी रणवीरसह 30 जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिसांनी रणवीर, समय रैनाला चौकशीसाठी समन्स केले होते. समय हा परदेशात असल्याने त्याच्या वकिलांनी सायबर पोलिसांकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितला होता. महाराष्ट्र सायबर विभागाने नकार दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

योगेश कदम यांचे विधान बालिशपणाचे… काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांनी दाखवला आरसा योगेश कदम यांचे विधान बालिशपणाचे… काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांनी दाखवला आरसा
पुणे स्वारगेट येथील शिवशाही एसटीबसमध्ये एका महिलेवर झालेल्या बलात्काराने खळबळ उडाली आहे. या संदर्भात मंत्री योगेश कदम यांचे विधान आश्चर्यकारक...
‘रात्री तू फ्रीजमध्ये झोपते वाटतं’, अभिनेत्रीला पाहून अक्षय कुमार असं का म्हणाला
“बॉलिवूड पहिल्यासारखा धर्मनिरपेक्ष राहिला नाही”; जॉन अब्राहम ‘छावा’बद्दल पुढे म्हणाला..
लाज वाटत होती, हात थरथरत होते अन् मी संधी.. ऐश्वर्या रायबाबत बडा अभिनेता असं काही बोलला; भडकली होती अभिनेत्री
‘लाज वाटली पाहिजे…’, राहुल गांधींविरुद्ध प्रिती झिंटा मानहानीचा खटला दाखल करणार? काय आहे प्रकरण?
कियारा अडवाणीने दिली ‘गुड न्यूज’; लवकरच बनणार आई
किचनमधील असा एक मसाला, केसांच्या समस्या चुटकीत संपतील, महागडे प्रोडक्टही फिके