Govinda : गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चेने खळबळ, अखेर जवळच्या व्यक्तीने सांगितलं सत्य
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी आणि भन्नाट डान्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मोठ्या पडद्यावर दिसला नव्हता पण सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. सुनीता अहुजाने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचीही चर्चा सुरू आहे. गेल्या 37 वर्षांपासून एकत्र असलेलं हे जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभ असल्याच्या चर्चांमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
यावर आत्तापर्यंत कोणीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता गोविदांने त्यावर आपलं म्हणणं मांडलं आहे. मी सध्या बिझनेसच्या चर्चांमुळे बिझी आहे. चित्रपटात पुन्हा कमबॅक करण्याच्या प्रक्रियेत गोविंदा सध्या बिझी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याने घटस्फोटाच्या विषयावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने याबाबतचं सत्य मांडलं आहे.
गोविंदा आणि सुनीता या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना 2 मुलंही आहेत. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता अनेक कार्यक्रमात एकत्र स्पॉट होतात आणि दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलत आहेत. आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, गोविंदाचा मॅनेजर उघडपणे बोलला आणि या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी त्याने मांडल्या आहेत.
गोविंदाचा मॅनेजर काय म्हणाला ?
गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिले. सुनीताच्या वक्तव्यामुळे लोकांना बोलण्याची संधी मिळाली आहे, असे ते म्हणाले. सुनीता यांनी गेल्या अनेक दिवसांत अनेक वक्तव्ये केली आहेत. ही विधाने खूपच विचित्र होती. हा सर्व लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रकार असल्याचा दावाही शशी यांनी केला आहे. IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात शशी म्हणाले की, गोविंदाने वेगळे होण्याबाबत कोणतेही अधिकृत पाऊल उचललेले नाही. मात्र सुनीताने नोटीस पाठवल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.
कोर्टाद्वारे पाठवली कायदेशीर नोटीस
सुनीताने न्यायालयाकडून कायदेशीर नोटीस पाठवली आहे, परंतु या नोटीसमध्ये काय आहे आणि ती काय पाठवली आहे याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही, असे शशी पुढे म्हणाले. ती नोटीस अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. सुनीता यांनी अलीकडेच वेगवेगळ्या प्रकारची विधाने केली आहेत ज्यामुळे लोकांमध्ये अशा प्रकारच्या विविध अटकळ बांधल्या जात आहेत. सध्या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे, असे त्यांनी नमूद केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List