शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार

हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते. जगाच्या इतिहासात एकमेक अशा महान राजाच्या हा वारसा जतन करण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात महाराजाच्या १२ गड आणि किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह्याद्री कडेकपारीतील जिता जागता इतिहास असलेल्या मावळप्रांतातील जु्न्रर येथील शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यापासून ते स्वराज्याची पहिली आणि दुसरी राजधानी असलेल्या राजगड आणि रायगड किल्ल्यांसह १२ किल्लांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळावे यासाठी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ
पॅरिसला दाखल झाले असून वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना हे शिष्टमंडळ रविवारी भेटले आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या राजे शिव छत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आहे.मात्र, त्यावर संपूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण आणि यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली, असेही अॅड, शेलार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.

शेलार पॅरीसमध्ये

महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ पॅरीसला गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य सरकारचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री एँड शेलार यांनी आभार मानले आहेत.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन यांचा समावेश आहे.

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार आहे. आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसाचा जतन आणि त्याचे महत्त्व वाढून त्याचे ऐतिहासिक पर्यटन देखील होण्यास मदत होई असे म्हटले जात आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गप्पा, हास्यविनोद… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटले, निमित्त लग्न सोहळा; तीन महिन्यात कितवी भेट? गप्पा, हास्यविनोद… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटले, निमित्त लग्न सोहळा; तीन महिन्यात कितवी भेट?
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाला मोठ्या अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. ठाकरे गटाचे तर आजवरच्या निवडणुकीतील सर्वात कमी आमदार...
Sindhudurg News – आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरकमहोत्सवानिमित्त नाटके व एकांकिकांची मेजवानी
हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, जम्मू कश्मीरमध्ये चाहत्यांनी फोडले फटाके
शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती