VIDEO: पूनम पांडेला भररस्त्यात जबरदस्तीने KISS करण्याचा प्रयत्न, प्रचंड घाबरलेल्या पूनमने फॅनला दिला धक्का
अनेकदा आपण पाहिलं असेल की सेलिब्रिटींसोबत अनेक विचित्र किस्से घडतात. विशेष करून अभिनेत्रींसोबत असे किस्से अनेकदा घडताना समोर आलं आहे. जसं की एखादी सेलिब्रिटी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असता त्यांच्या भोवती चाहत्यांचा प्रचंड गराडा असतो. कधी कधी गर्दीचा फायदा घेत अनेक जण अभिनेत्रींनी हात लावणे किंवा त्यांच्याजवळ येत जबरदस्तीने सेल्फी काढणे वैगरे असे अनेक प्रकार करतात.
मॉडल पूनम पांडेसोबत धक्कादायक प्रकार
असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे प्रसिद्ध मॉडल पूनम पांडे हिच्यासोबत. पूनम एके ठिकाणी बोल्ड ड्रेसमध्ये पापाराझींसमोर फोटोसाठी पोज देत असताना अचानक एक चाहता तिच्या पाठीमागून आला आणि त्याने तिच्याजवळ येत सेल्फीसाठी विनंती केली आहे. मात्र ती काही उत्तर देण्याच्या आतच त्याने असं काहीतरी विचित्र गैरवर्तन केलं की सगळ्यांनाच धक्का बसला.
बोल्ड ड्रेसमधील फोटोशूट चांगलंच महागात
पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड ड्रेसमुळे चर्चेत असते. पण आज हीच तिची स्टाईल चांगलीच महागात पडली आहे. पूनम पापाराझींसाठी पोज देत होती. पूनमने शिमरी लाल रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस घालून फोटोसाठी पोज देत असताना अचानक एक चाहता मागून आला आणि तो पूनमच्या इतका जवळ उभा राहिला की त्यामुळे ती थोडी अस्वस्थ झालेली दिसली.
पूनमला चाहत्याकडून जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न
यानंतर त्याने आपला फोन काढला आणि सेल्फी घेण्यासाठी त्याने पूनमच्या जवळ येऊन सेल्फी कॅमेरा ऑन केला मात्र सेल्फी घेताना अचानक तो पूनमला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करू लागतो. हे दृश्य पाहून सगळेच शॉक होतात. पूनमही त्याला ढकलून दूर सरकते. यानंतर, पूनमसोबत उपस्थित असलेले लोक या माणसाला मागे खेचतात आणि त्याला तिथून हाकलून दिल जातं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण हा व्यक्ती दारूच्या नशेत होता असंही म्हटलं जातं आहे. त्यातच त्याने पूनमसोबत गैरवर्तन केलं.
पूनम प्रचंड घाबरली होती
पण या प्रकारामुळे पूनम प्रचंड घाबरली होती. तिच्या सहकाऱ्यांनी तात्काळ पुढे येऊन तिच्या त्या व्यक्तीला तिच्यापासून दूर केलं आणि त्याला तिथून हाकलून लावलं. काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक वेळा सेलिब्रिटी अशा चाहत्यांच्या कृतींचे बळी ठरले आहेत. पुरूष कलाकारही त्याचे बळी ठरले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List