सार्वजनिक गणेशोत्सवातही तोच नियम, मंडळांनो महापालिककेचं परिपत्रक वाचलं का? A टू Z अटी वाचा एका क्लिकवर

सार्वजनिक गणेशोत्सवातही तोच नियम, मंडळांनो महापालिककेचं परिपत्रक वाचलं का? A टू Z अटी वाचा एका क्लिकवर

गणेशोत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात, आणि विदेशातंही उत्साहाने साजरा करण्यात येतो. मात्र आता यांसदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POP मूर्तींना बंदी असणार आहे. माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचे सावट आहे. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. सार्वजनिक उत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पध्दतीने तसेच सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, मूर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शनाकरिता सूचना करण्यात आल्या आहेत. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं बीएमसी कडून सांगण्यात आलं आहे.

सार्वजनिक उत्सव हा पूर्णपणे पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POPच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी असेल असं त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या परिपत्रकानंतर आगामी काळात राजकीय नेते, मूर्तीकार तसेच गणेशोत्सव मंडळांची यावर काय भूमिका असेल ते पाहणं महत्वाचं ठरेल. कारण माघी गणेशउत्सव काळात POP च्या मूर्त्या असल्याने तलावात विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. यावरून मुंबई उपनगरात मंडळानी निषेध केला होता. कोर्टाच्या नियमांचे पालन करूनच मूर्ती घडवावी असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत. आताही हाच निर्णय असल्याने आगामी काळात त्यांच्या भूमिकांकडे सर्वांच लक्ष असेल.

परिपत्रकातील नियम कायम ?

  • मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक 30.01.2026 रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मुर्तीना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. 12.05.2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
  • मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मुर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल.
  • सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी.
  • मुॉॉर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास 2000 रुपये प्रत्ती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
  • येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेश व्दारावरील दर्शनी भागात्त सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा.
  • उत्सवा वादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहिल एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर “पन्हाळगडचा रणसंग्राम, पन्हाळ गडावरून सुटका” लघुपट व 13 डी थिएटरचा शुभारंभ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…
Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव