भयंकर! कर्नाटकात नर्सने मुलाच्या जखमेवर टाक्यांऐवजी लावले फेविक्विक
कर्नाटकात एक विचित्र घटना समोर आली आहे. हावेरी येथील अडुरु प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेने एका सात वर्षाच्या मुलाला जखम झाल्याने त्याच्या गालाल चक्क फेविकॉल लावला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. मात्र जखमेवर टाके घालण्याऐवजी, परिचारिकेने त्याच्या गालावर फेविक्विक ग्लू लावला. या घटनेनंतर त्या परिचारिकेचे निलंबन करण्यात आले आहे.
बसवराज मारलिहल्लीच्या यांच्या वृत्तानुसार, परिचारिकेच्या म्हणण्यांनुसार मुलाच्या गालाला टाके घातले असते तर त्याचा चेहरा विद्रुप दिसला असता. त्यामुळे त्याच्या गालावर टाक्यांऐवजी फेविक्विव लावला. गुरुकृष्ण अन्नप्पा होसामणि असे त्या मुलाचे नाव आहे. जानेवारी रोजी त्याच्या चेहऱ्याला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यावर उपचारासाठी तो पीएचसी येथे नेण्यात आले.तिथे ज्योति नावाच्या परिचारिकेने त्याच्या गालावर टाक्यांऐवजी फेविक्विक लावले आणि त्याला कापसाने बंद केले. त्यानंतर त्याच्यावर पट्टी लावली.
नर्सच्या या विचित्र वागणुकीमुळे मुलाच्या पालकांना प्रचंड धक्का बसला असून ते संतप्त झाले. उपचाराची ही पद्धत हानिकारक असल्याने, मुलाच्या कुटुंबाने स्थानिक आरोग्य सुरक्षा समितीकडे तक्रार दाखल केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (डीएचओ) त्या परिचारिकेची दुसऱ्या युनिटमध्ये बदली केली. नर्सवर केलेल्या अशा हलक्या कारवाईमुळे सोशल मीडियावरील लोक संतापले. यानंतर, डीएचओ राजेश सुरगिहल्ली यांनी 17 जानेवारी रोजी त्या परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि नंतर तपास होईपर्यंत तिला निलंबित करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List