शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून शाहरुख खान ओळखला जातो. आता शाहरुखबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या पाली हिलमध्ये त्याने दोन आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतल्याचे समोर आले आहे. आता या लग्झरी अपार्टमेंटसाठी शाहरुख खानला किती पैसे मोजावले लागणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
शाहरुख किती भरणार भाडे?
मुंबईतील खार परिसरातील ‘पूजा कासा’ नावाच्या बिल्डींगमध्ये शाहरुख खानने दोन अपार्टमेंट भाडे तत्त्वार घेतल्या आहेत. डेटा एनालिटिक फर्म ‘जॅपकी’ने दिलेल्या माहितीनुसार, या दोन अपार्टमेंटसाठी १४ फेब्रुवारी रोजी ‘लीव अँड लाइसेंस अॅग्रीमेंट’ साइन करण्यात आला आहे. अॅग्रीमेंटमध्ये दोन्ही अपार्टमेंटचे एकूण भाडे जवळपास २.९५ कोटी रूपये आहे. म्हणजेच दर महिन्याला शाहरूख २४.१५ लाख रुपये भाडे देणार आहे. शाहरूखने भाडे तत्त्वार घेतलेले हे अपार्टमेंट अभिनेता जॅकी भगनानी आणि त्याची बहिण दीपशिखा देशमुख यांचे आहे.
तीन वर्षांसाठी केला करार
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की जॅकी आणि दीपशिखाने शाहरुख खानसोबत ३६ महिन्यांचा करार केला आहे. म्हणजेच जवळपास तीन वर्षे शाहरूख या लग्झरी डुप्लेक्समध्ये राहणार असून तो ८.७० कोटी रुपये भाडे देणार आहे. पण शाहरुखवर घर भाडे तत्त्वार घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न मात्र चाहत्यांना पडला आहे.
शाहरूख खानची एकूण संपत्ती
अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. तो इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जातो. हुरून इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ५७ वर्षीय शाहरुख खानकडे एकूण ७३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये शाहरूखच्या चित्रपट आणि जाहिरातींमधून होणारी कमाई देखील सामिल आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List