अंधारानंतर प्रकाश येतोच…, सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनाने पोस्ट केलेत ‘ते’ फोटो
Kareena Kapoor Khan: काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत होते. आता सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना हिने पहिल्यांदा सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करीना हिने भाऊ आदर जैन याच्या मेहेंदी सोहळ्यातील तिच्या खास लूकचे काही फोटो पोस्ट केले आहे. मेहेंदी सोहळ्यासाठी अभिनेत्री पीकॉक ग्रीन रंगाचा कफ्ताना घातला होता. ज्यामध्ये करीना प्रचंड सुंदर दिसत होती.
स्वतःचे फोटो पोस्ट करत करीना कपूर हिने खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘अंधारानंतर प्रकाश हा येतोच… नकारात्मक गोष्टींना मागे ठेवून आनंद साजरा करणं… आपल्या आवडत्या लोकांसोबत प्रेम आणि कुटुंबिय सोहळ साजरा करणं… प्रेम प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवतो…’, सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर सध्या आदर जैन याच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, पापाराझींनी करीना हिला कॅमेऱ्यात कैद केलं. तिच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूर देखील होते. करिश्मा हिने गुलाबी रंगाचा ड्रेस घेतला होता. दोघींचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला
16 जानेवारी रोजी मध्यरात्री सैफ अली खान याच्या घरावर हल्ला झाला. एक अनोखळी व्यक्ती सैफच्या घरात घुसला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ सैफ याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. सैफच्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं असून कुटुंबाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. शिवाय, घडलेल्या घटनेनंतर सैफ आणि करीना यांनी मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List