नशा नको, नोकरी द्या! पुण्यात युवक काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन
राज्यातील वाढती बेरोजगारी आणि ड्रग्ज तस्करीविरोधात युवक काँग्रेसने रविवारी हल्लाबोल आंदोलन केले. ‘नोकरी द्या, नशा नको…भाजप सरकार हाय… हाय, अशा घोषणा देत कार्यकर्ते काँग्रेस भवन येथून डेक्कनकडे निघाले. मात्र, बालगंधर्व येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविले. यावेळी आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. बॅरिकेड्सवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List