ठाकरे गटाला गळती का लागली? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितलं मोठं कारण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेत महायुतीला विजय मिळाला, तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मिळेल. दोन-चार माणसं सोडली तर कोण खुश आहे? म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले?
विधानसभेत महायुतीला विजय मिळाला, तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मिळेल. दोन-चार माणसं सोडली तर कोण खुश आहे? म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, हे तुम्ही पाहात आहात. आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा आपल्याला लोक का सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. नुकतीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक पार पडली, ज्यांनी शिवसेनेला, हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं त्यांनी आता बैठक घेऊन काय फायदा, असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, लोक स्वतःहून पक्षात येत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. विकास विरोधी जे आहेत त्यांना कार्यकर्ते सोडत आहेत, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांना शिव्या शाप द्या, मात्र काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या शाप देतात. कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात यश मिळाले आहे, अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीमागे थांबण नेत्याचं काम आहे. पाठीशी उभे राहणारे नेते पाहिजेत नाही तर आप आगे बढो हम कपडे सभालते हें अस नको व्हायला, असा टोलाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
महादजी शिंदे पुरस्कार मला मिळाला, मात्र पोटदुखी काय थांबेना,गेल्या अडीच वर्षांपासून ही पोटदुखी सुरूच आहे औषध जर कंपाउंडर देतो तर रोगावर इलाज होईलच कसा? असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List