ना जीम, ना लाखोंचं डाएट तरही इतकी सुंदर; 54 वर्षांच्या भाग्यश्रीचा सोफा वर्कआउट होतोय व्हायरल

ना जीम, ना लाखोंचं डाएट तरही इतकी सुंदर; 54 वर्षांच्या भाग्यश्रीचा सोफा वर्कआउट होतोय व्हायरल

बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या फिटनेसबाबत किती तत्पर असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. व्यायाम, योगा, जीम एवढंच काय तर त्यांच्या डाएट प्लानसाठी त्यांचे खासगी डायटेशिअन असतात.त्यावर सेलिब्रिटी लाखोंने खर्च करत असतात. या स्टार्सपैकी कितीतरी जणांचे डाएट प्लान, जीमचे व्हिडीओ फोटो आपण सोशल मीडियावर पाहत असतो. पण अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जी नाही जिमला जात, ना तिचे कोणी खासगी डायटेशिअन आहेत. पण तरीही तिला पाहून हा प्रश्न पडतो की ही स्वत:चं फिटनेस कसं सांभाळत असेल.

स्वत:चं फिटनेस कसं सांभाळते भाग्यश्री?

ही अभिनेत्री आहे भाग्यश्री. भाग्यश्री सध्या 54 वर्षांची आहे. तरीही तिला पाहून तिचं वय मात्र नक्कीच दिसत नाही. अनेक चाहते सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून तिच्या फिटनेस आणि अजूनही आहे तसंच सुंदर दिसण्याचं सहस्य काय आहे.

तर याचं उत्तर स्वत: भाग्यश्रीने दिलं आहे. सध्या भाग्यश्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ती आजही वयाप्रमाणे फिटनेससाठी कोणतीही तडजोड करत नाही हे दिसून येत.

भाग्यश्रीचा सोफा वर्कआउट

इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असणाऱ्या भाग्यश्रीने तिच्या फिटनेसचे रहस्य शेअर केलं आहे. भाग्यश्री तसे अनेकदा इंस्टाग्रामवर तिच्या फिटनेसशी संबंधित व्हिडिओज शेअर करत असते. मात्र ज्यांनी जमिनीवर बसून योगा करणे किंव हालचाल करणे जमत नाही त्यांच्यासाठी कोणता वर्कआउट असू शकतो तर तिने एक व्हिडिओ शेअर सोफ्यावरच बसून करता येणार व्यायाम सांगितला आहे. जर तुम्हाला जास्त वेळ जिममध्ये घालवता येत नसेल, तरीही तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटे दररोज असा व्यायाम केला तरी तुम्ही फिट राहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyashree (@bhagyashree.online)

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे असा करायचा वर्कआउट?

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सोफ्यावर बसा आणि पाय 90 डिग्रीच्या कोनात ठेवा. संपूर्ण शरीर कमरेपासून वळवा, हात पूर्ण पसरवा. शरीर तुमच्या इनर थाईला स्पर्श करायला हवा. या व्यायामामुळे पाठीचा कणा आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात.

सोफ्यावर सरळ बसा, एक पाय दुसऱ्या पायावर ठेवा. पाठीचा खालचा भाग, रीढेची हाडे आणि मान सरळ ठेवून पुढे झुका. हा व्यायाम पाठीच्या दुखण्यावर खूप प्रभावी आहे.

एका पायाला जमिनीवर स्थिर ठेवा आणि दुसरा पाय त्यावर ठेवा. घोट्यावर उलट्या हाताने हलका दाब द्या आणि कमर मागे वळवा. या एक्सरसाइजमुळे कंबर आणि पाठीच्या स्नायूंना ताकद मिळते.

एका पायावर सोफ्यावर ठेवा आणि दुसरा पाय जमिनीवर ठेवा. हात खांद्याच्या समांतर रेषेत वर घ्या आणि अर्ध्या स्क्वाटच्या पोझिशनमध्ये बसा. लक्षात ठेवा की गुडघे पायाच्या अंगठ्याच्या पुढे जाऊ नयेत. 10 सेकंदापर्यंत ही पोझिशन होल्ड करून ठेवायची आहे. अशा काही सोफ्यावर बसल्या बसल्याही तुम्ही करू शकाल असा वर्कआउट आहे. ज्यामुळे तुम्ही व्यायम करायल सुरुवात करणार असाल तरी हा व्यायम तुम्हाला फार जड जाणार नाही.

तर अशापद्धतीने भाग्यश्रीने तिच्या फिटनेसमधील किंवा तिच्या वर्कआउटमधील एक महत्त्वाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अशा सोप्या व्यायामासह तुम्ही वर्कआउटची सुरुवातही करू शकाल. दरम्यान भाग्यश्री वर्कआउटसोबतच आरोग्यदायी पेय किंवा काही खाण्या-पिण्याच्या बाबत मार्गदर्शन करत असते. तिच्या याच फिटनेस फंड्यांमुळे ती आजही तितकीच सुंदर आणि फिट आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा
Home Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा दिला आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस...
तब्बल ८५ वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा, पाहा काय घडामोडी
‘पाल मेल्यावर शेपूट वळवळतं आता तेवढीच…’ रामदास कदमांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं
हिंदू अभिनेत्रीने केले होते मुस्लिम निर्मात्याशी लग्न, बदलले नाही आडनाव; आज आहे ४०० कोटींची मालकीण
त्यामुळे त्वचा सतत कोरडी पडते; वयाच्या ४०व्या वर्षी प्रार्थना बेहेरे करत आहे ‘या’ आजाराचा सामना
‘ही’ अभिनेत्री एकेकाळी कॉफी शॉपमध्ये वेटरचं काम करायची; आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री
रोस्टेड चिकन, स्प्रिंग ग्रीन सलाद अन् क्रीम ब्रुले तसंच राहिलं; आदेश येताच झेलेन्स्की यांना तडकाफडकी व्हाईट हाऊस सोडावं लागलं