मिंधे गटात कबड्डी कबड्डी करून राजन साळवींना आपटायची तयारी सुरू; भास्कर जाधव यांचा जबरदस्त टोला
माजी आमदार राजन साळवी यांनी मिंधे गटात प्रवेश केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी मिंधे गट आणि साळवी यांना जबरदस्त टोला हाणला आहे. साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही? तिथे विरोध कोणी केला? हा खरा प्रश्न आहे. आता मिंधे गटातील पक्षप्रवेशावेळी सामंतबंधूंनी साळवींचे स्वागत केले असेल तर मला माहित नाही. पण आता राजन साळवीचे शिंदे गटात स्वागत आहे की त्यांना कबड्डी कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे, हे येत्या काळात दिसेल, असा जबरदस्त टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. आमदार भास्कर जाधव यांनी राजन साळवी यांचा चांगलाच समाचार घेतला. राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान असे स्वतःला म्हणवत होते. जेव्हा स्वतःच स्वतःला एखादी बिरुदावली लावतो, तेव्हा लोकांना अप्रूप वाटते. मात्र नंतर तो चेष्टेचा विषय होतो. आता ही निष्ठावान बिरुदावली तुम्हाला लावावी का? असा प्रश्न राजन साळवींनाच विचारा असा टोला भास्कर जाधव यांनी हाणला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे कार्यकर्ते फोडणे याला ऑपरेशन टायगर म्हटले जाते. पण आजही एकच टायगर आहे तो म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे, हे विरोधकांना मान्य करावेच लागेल. जाणाऱ्यांनी आपली जाण्याची वेळ योग्य आहे का, याचा विचार करावा असा सल्लाही आमदार भास्कर जाधव यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List