इंद्रायणी नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी एल्गार, … अन्यथा अधिकाऱ्याना दुर्गंधीयुक्त पाण्याने अंघोळ चालू

इंद्रायणी नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी एल्गार,  … अन्यथा अधिकाऱ्याना दुर्गंधीयुक्त पाण्याने अंघोळ चालू

नदीपात्रामध्ये दुर्गंधयुक्त पाणी वर्षानुवर्षे वाहत आहे. संबंधित प्रशासन विभागाने जातीने लक्ष देऊन इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत. येत्या महिनाभरात इंद्रायणी नदी स्वच्छ न केल्यास याच इंद्रायणी नदीचे दूषित करावेच युक्त्या महिनाभरात इंद्रायणी नदी स्वच्छ केल्यास याच इंद्रायणी नदीचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्नान घालून वेळप्रसंगी हे पाणी त्यांना पिण्यास भाग पाडू, असा इशारा समस्या निवारण समितीने दिला आहे.

समितीचे अध्यक्ष सुधीर जगताप, संगीता जाधव, रवींद्र जगताप, आकाश सोनवणे, कृष्णा म्हेत्रे यांनी याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र आळंदी व तीर्थक्षेत्र देहूगाव या दोन्ही ठिकाणी राज्यभरातून व इतर राज्यांतून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूस उंच इमारती, रासायनिक दूषित पाणी सोडणाऱ्या छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. महापालिकेच्या हद्दीतील चिखली, मोशी, डुडुळगाव तसेच आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील इमारतींच्या शौचालयाचा मैला सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. त्यामुळे देहूगाव व आळंदी दरम्यान वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रामध्ये दूषित व आरोग्यास हानिकारक पाणी वाहत असते. पाण्यामध्ये फेस होत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णी निर्माण होत आहे.

दोन्ही तीर्थक्षेत्रांवर राज्यातून व परराज्यातून दर्शनासाठी हजारो भाविक येतात. हे भाविक पवित्र इंद्रायणीत स्नान करतात. नदीतून वाहणारे पाणी रोगराईला निमंत्रण देणारे असून नागरिकांच्या व भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व आळंदी नगरपरिषदेच्या स्थापत्य व मैला शुद्धीकरण व आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाला याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. परंतु, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नाही. यामुळेच नदीपात्रामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी वर्षानुवर्षे वाहत आहे. प्रशासनाने जातीने लक्ष देऊन इंद्रायणी नदी स्वछ करण्यासाठी प्रयत्न करावेत. आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन इंद्रायणी नदीत मैलायुक्त व रासायनिक पाणी थांबविण्याच्या सूचना द्याव्यात. येत्या महिनाभरात इंद्रायणी नदी स्वच्छ न केल्यास याच इंद्रायणी नदीच्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याने महापालिका, नगरपरिषद व तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्नान घालून वेळ प्रसंगी हे पाणी त्यांना पिण्यास भाग पाडू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तिसऱ्या महायुद्धावर जुगार खेळू नका’, कॅमेरासमोरच ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध; पाहा VIDEO ‘तिसऱ्या महायुद्धावर जुगार खेळू नका’, कॅमेरासमोरच ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध; पाहा VIDEO
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील भेटीनंतर काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचं पाहायला...
Obesity Control: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय? ‘या’ ट्रिक्स करतील वजन कमी…..
Sweet Craving Control: तुम्हाला सुद्धा जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय आहे का? नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो….
मांसाहारीच नाहीतर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही प्रथिनांचा भरघोस साठा, आहारात करा समावेश
Champions Trophy 2025 – पराभव जिव्हारी लागला, ‘या’ खेळाडूने कर्णधारपदाचा दिला राजीनामा
बॅलेट पेपरच निवडणुकीसाठीचं सर्वात सुरक्षित माध्यम; EVM वरून ट्रम्प यांचं पुन्हा मोठं विधान, मोदींवर साधला अप्रत्यक्ष निशाणा
पद्मश्री नामदेव ढसाळ यांची अवहेलना करणाऱ्या सेन्सर बोर्ड अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा, युवा पँथर संघटनेची मागणी