Chhaava: ‘या’ 5 ठिकाणी ‘छावा’ कमी पडला, सिनेमातील 5 कमकुवत बाजू
Chhaava: अभिनेता विकी कौशल आणि आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा अखे प्रदर्शित झाला आहे. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पण सिनेमात काही अशा देखील बाजू आहेत, त्या सिनेमाला कमकुवत करत आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी केलेल्या त्याग आणि बलिदानाची ही कथ प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. पण सिनेमाशी संबंधित 5 कमजोर मुद्दे आहेत, जे तुम्हाला निराश करू शकतात.
रश्मिका मंदाना – सिनेमात अभिनेत्रीने छत्रपती संभांजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांच्या भूमिका साकारली आहे. सिनेमात रश्मिकाचे उच्चारात कोकणातील नाही तर, दाक्षिणात्य भागातील स्वर लगेच कळून येतो. सिनेमा हिंदी असला तरी पात्र मराठी आहे. त्यामुळे रश्मिकाकडून उत्तम अभिनयाची अपेक्षा होती. प्रियांका चोप्राने साकारलेली ‘काशीबाईंची’ भूमिका किंवा क्रिती सेनॉन हिने साकारलेली ‘पार्वतीबाईंची’ पाहिल्यानंतर ‘छावा’च्या येसूबाई प्रेक्षकांची निराशा करतात.
एआर रेहमान यांचं संगीत : ए आर रेहमान यांच्या संगीतात फोक स्टाईल गायब आहे. केवळ ढोल वाजवून संगीत पूर्ण होत नाही. एकीकडे रेहमान यांनी औरंगजेबसाठी केलेलं संगीत उत्कृष्ट आहे कारण ती त्यांची शैली आहे. सिनेमासाठी दिग्दर्शक उतेकर यांनी अजय अतुल, शंकर-एहसान-लॉय यांसारख्या गायकांसोडून सिनेमासाठी तमिळ संगीत दिग्दर्शकाची निवड का केली ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
सिनेमातील गाणी : सिनेमात असं एकही गाणं नाही जे आपल्याला सतत ऐकायला आवडेल. अशा सिनेमांमध्ये एक तरी भक्तिगीत असतं. तान्हाजी सिनेमात ‘शंकरा’ होते, बाजीराव मस्तानी सिनेमात ‘गजानना’ होते. पण ‘छावा’ सिनेमात एक गाणं गाजेल असं नाही.
पूर्वार्थ (फस्ट हाफ) : सिनेमाचा पूर्वार्थ स्लो आहे. कथा समजायला थोडा वेळ लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निकटवर्तीयांबद्दल चुकीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू नये यासाठी दिग्दर्शकाने स्वत:च्या व्हिजनशी तडजोड केली असावी.
डायना पेंटी : सिनेमात अभिनेत्री डायना पेंटी अकबरच्या मुलीची भूमिका साकारली आहे. जरी तिने सिनेमात चांगला अभिनय केला आहे. पण जेव्हाही ती अक्षय खन्ना आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करते तेव्हा त्यांच्यासमोर डायनाची बाजू कमकुवत दिसते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List