रशियाचा युक्रेनच्या चेरनोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला, झेलेन्स्की रशियावर भडकले

रशियाचा युक्रेनच्या चेरनोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला, झेलेन्स्की रशियावर भडकले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी रशिया-युक्रेनला शांततेचे आवाहन केले असतानाच दुसरीकडे रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाने आता घातक वळण घेतले आहे. रशियाने युक्रेनच्या चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला आहे. यामुळे जागतिक अणु सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाचा हा हल्ला जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चेरनोबिल येथील हे विशेष युनिट युक्रेन, युरोप, अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने रेडिएशनचे धोके टाळण्याच्या उद्देशाने बांधण्यात आले आहे.

चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ल्यानंतर लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले आहे. ड्रोन हल्ल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पातील रेडिएशनची पातळी सामान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला, असे म्हटले आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय नियम डावलून अणुस्थळांना लक्ष्य केल्याचा आरोपही झेलेस्की यांनी केला आहे. असे हल्ले जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे त्यांना त्वरित रोखण्याची आवश्यकता असल्याचेही झेलेन्स्की यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी चुकीचे केले नाही त्यामुळे माफी मागणार नाही, ट्रम्पसोबतच्या वादानंतर झेलेन्स्की आपल्या भूमिकेवर ठाम मी चुकीचे केले नाही त्यामुळे माफी मागणार नाही, ट्रम्पसोबतच्या वादानंतर झेलेन्स्की आपल्या भूमिकेवर ठाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. या भेटीच्या वेळी पत्रकारांसमोरच त्या...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
एमबीबीएस प्रवेशात चांगल्या विद्यार्थ्यांचे पाय ओढले जातात, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण
अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर योजनेच्या थकबाकीचा उतारा, शेतकरी कर्जमाफीची घोषणा कागदावर
तुम्हाला आयाबहिणी आहेत की नाहीत? मंत्री योगेश कदम, संजय सावकारे यांच्याविरोधात प्रचंड संताप
कोर्ट रूममध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करणे पडले एक लाखाला, हायकोर्टाने गंभीर दखल घेतल्याने भरपाई देणार
काळोखाच्या सावल्या! पोलीस अमावास्येच्या रात्री घालतात गस्त, ब्रिटिशांनी सुरू केलेली परंपरा आजही जपली जातेय