मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानाकडून छावणीत गोळीबार, 3 जवानांचा मृत्यू; 8 जखमी
मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने आपल्याच छावणीवर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबारात 3 जवानांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर जवानाने आत्महत्या केली. संजय कुमार असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी जवानांना उपचारासाठी तात्काळ इंफाळमधील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्था येथे नेण्यात आले. संजय कुमारने गोळीबार आणि आत्महत्या का केली याबाबत अद्याप समजू शकले नाही.
घटनेबाबत तपास सुरू आहे. अधिकारी घटनेची माहिती घेत आहेत. तपासानंतरच घटनेचे कारण समजू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List