रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी वेलची आहे फायदेशीर! जाणून घ्या वेलचीचे इतर फायदे
आपल्या स्वयंपाकघरातील अनेक गरम मसाले हे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहेत. परंतु माहितीअभावी मात्र आपण त्यांचा उपयोग करत नाही. पूर्वीच्या काळी गरम मसाल्यांचा उपयोग हा औषधांसाठीही केला जायचा. परंतु सध्याच्या घडीला मात्र माहीत नसल्यामुळे, आपल्याला कोणत्या मसाल्यांचा वापर कशापद्धतीने करता येऊ शकतो हे मात्र आपल्या गावीही नसते.
असाच मसाल्यातील एक महत्त्वाचा मसाला म्हणजे, वेलची. भारतीय स्वयंपाकघरात तुम्हाला वेलची सहज मिळेल. चहामध्ये वापरण्यासोबतच वेलचीचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो, पण तुम्ही विचार केला आहे का की छोटी वेलची तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील वेलची खूप फायदेशीर आहे.
चला तर मग जाणून घेऊया वेलचीचे इतर कोणते फायदे आहेत. वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब असलेल्यांनी त्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. वास्तविक, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात. चयापचय गतिमान करण्यासाठी वेलचीचे सेवन देखील खूप फायदेशीर आहे.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी, आपण आपल्या आहारात वेलचीचा समावेश केला पाहिजे. वेलची खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणजेच ते खाल्ल्याने तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
ज्या लोकांना वेळेवर झोप येत नाही किंवा झोप कमी होण्याची समस्या आहे त्यांनी वेलचीचे सेवन जरूर करावे. वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून काम करते. तुम्ही वेलचीच्या बिया थेट चावून खाऊ शकता. याशिवाय तुम्ही चहामध्ये वेलचीचे सेवन करू शकता. तुम्ही वेलचीचे सेवन कोणत्याही पदार्थात करू शकता. त्यामुळे जेवणाची चवही वाढेल.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List