Nanded crime news – गुरुद्वार गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, नांदेड पोलिसांची कारवाई

Nanded crime news – गुरुद्वार गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, नांदेड पोलिसांची कारवाई

नांदेडमधील गुरुद्वार येथे 10 फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबार प्रकरणात नांदेड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांनीही हल्लेखोराला मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता नांदेडच्या गुरुद्वारा गेट क्र. 6 परिसरात पॅरोलवर सुटलेल्या गुरमितसिंघ सेवादार व रविंद्रसिंग राठोड याच्यावर सराईत आरोपीने 10 गोळ्या झाडल्या होत्या. नियोजनबद्ध पद्धतीने गोळीबार करून सदरचा आरोपी दुचाकीवरून फरार झाला होता. या गोळीबारात रविंद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला होता, तर सेवादार हा जखमी झाला होता. सेवादार याला बबर खालसाचा दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या याचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पॅरोलवर सुटून तो नांदेड येथे आला होता.

दरम्यान, हल्लेखोर गोळीबार करून दुचाकी क्र. एमएच 26, बीके 1564 वर बसून पळून गेला होता. सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला होता. तो मूळचा नांदेड येथील रहिवासी नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. कुणाच्यातरी मदतीने त्याने हा हल्ला घडवल्याचा संशय पोलिसांना होता आणि त्याच दृष्टीने तपास सुरू होता.

पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, संतोष तांबे यांच्यासह पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. यात पोलिसांना यश आले असून हल्लेखोरांना मदत केल्याप्रकरणी मनप्रितसिंग उर्फ मन्नु गुरूबक्षसिंग ढिल्लो (वय – 31 रा. शहिदपुरा, नांदेड) आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबूसिंघ कारपेंटर (वय – 25, रा.शहिदपुरा, नांदेड) या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून एक बिना नंबरची दुचाकी गाडी आणि एक काळ्या रंगाची, काचांना काळी फिल्म लावलेली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच. 26 सी.डी. 1699 अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या वृत्तास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची 42 मजल्यापर्यंत धावाधाव आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची 42 मजल्यापर्यंत धावाधाव
भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील न्यू ग्रेट ईस्टर्न मिलजवळच्या सेलटेक या 57 मजली गगनचुंबी इमारतीच्या 42 व्या मजल्यावर आज...
‘तिसऱ्या महायुद्धावर जुगार खेळू नका’, कॅमेरासमोरच ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध; पाहा VIDEO
Obesity Control: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय? ‘या’ ट्रिक्स करतील वजन कमी…..
Sweet Craving Control: तुम्हाला सुद्धा जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय आहे का? नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो….
मांसाहारीच नाहीतर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही प्रथिनांचा भरघोस साठा, आहारात करा समावेश
Champions Trophy 2025 – पराभव जिव्हारी लागला, ‘या’ खेळाडूने कर्णधारपदाचा दिला राजीनामा
बॅलेट पेपरच निवडणुकीसाठीचं सर्वात सुरक्षित माध्यम; EVM वरून ट्रम्प यांचं पुन्हा मोठं विधान, मोदींवर साधला अप्रत्यक्ष निशाणा