विवाहित महिलेचं वसुली एजंटवर जडलं प्रेम, देवाच्या साक्षीने बांधली लग्नगाठ
बिहारमधील जमुई येथे एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका महिलेने तिच्या दारूड्या नवऱ्याला कंटाळून एका कर्ज वसुली करणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं. सध्या हे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
इंद्रा कुमारी असे त्या महिलेचे नाव आहे. 2022 मध्ये इंद्रा कुमारी यांचे लग्न जमुई जिल्ह्यातील नकुल शर्मा यांच्याशी झाले होते. सुरूवातीचा काळ चांगला गेला. पण हळूहळू त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. नकुल व्यसनी होता. त्यामुळे त्याने दारू पिऊन इंद्राला छळायला सुरुवात केली. हा छळ सहन न झाल्याने इंद्राला यासगळ्यातून सुटका मिळवायची होती.
दरम्यान, याच काळात तिची भेट कर्ज वसुली करणाऱ्या एका एजंटसोबत झाली. पवन कुमार असे त्यांचे नाव आहे. यानंतर पवन आणि इंद्रा यांच्यात हळूहळू मैत्री होऊ लागली. अनेकदा ते एकमेकांना भेटायचे, फोनवर बोलायचे. यातूनच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तब्बल पाच महिने, इंद्रा आणि पवन यांनी त्यांचे नाते लपवून ठेवले. अखेर 4 फेब्रुवारी रोजी, इंद्र आणि पवन यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि पश्चिम बंगालमधील आसनसोलला पोहोचले.
आसनसोलमध्ये इंद्राची मावशी राहते. त्यामुळे हे दोघेही काही दिवस इंद्राच्या मावशीकडे राहिले. यानंतर पुन्हा जमुईला परतले आणि 11 फेब्रुवारी रोजी एका मंदिरात हिंदू विधीनुसार लग्न केले. या लग्नाला अनेक लोक उपस्थित होते. पवनच्या कुटुंबाने लग्नाला संमती दिली. परंतु इंद्राच्या कुटुंबाने विरोध केला आणि पवनविरुद्ध एफआयआर दाखल केला. लग्नानंतर, सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List