‘दयाबेन’नं हसत हसत प्रसुतीच्या वेदना सहन केल्या; मंत्रांच्या जपामुळे चमत्कार घडला
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्ही शो 2008 पासून सुरू आहे आणि चाहत्यांच्या हृदयात या मालिकेनं एक खास स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे लोकांना आवडतात. त्यापैकी एक म्हणजे ‘दयाबेन’, जिची भूमिका दिशा वाकानीने साकारली होती. दयाबेन शिवाय ही मालिका खंरच अपूर्ण आहे. पण 2018 मध्ये, अभिनेत्रीने ही मालिका सोडली. अभिनयातून ब्रेक घेत दिशा तिच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
तारक मेहताच्या दयाबेनचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान दिशाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तिने प्रसुतीच्या वेळी तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांयगितला आहे. खरंतर दिशाने या प्रसंगाला एक चमत्कार म्हटलं आहे. तिने सांगितले की तिची पहिली प्रसूती झाली तेव्हा तिने अगदी हसत हसत बाळाला जन्म दिला होता. ती प्रसुतीच्या वेळी ओरडली नव्हती. तिने एका मंत्रामुळे हा चमत्कार झाल्याचं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
प्रेग्नंसीमध्ये तिला आलेला मंत्राचा चमत्कारिक अनुभव
दिशाचा हा व्हिडिओ समोर आला असून ज्यामध्ये दिशाने तिचा प्रेग्नंसीचा प्रवास शेअर केला आहे. तिने तिच्या प्रेग्नंसीमध्ये पालकत्वाचा कोर्स करत होती. बाळ होताना खूप वेदना होतात असं तिला सांगण्यात आलं होतं तसेच कोणीतरी तिला हेही सांगितलं होतं की प्रसूतीदरम्यान ओरडलं तर, पोटातील बाळ घाबरतं.
या सर्व सल्ल्यांमुळे ती प्रचंड गोंधळली आणि घाबरली होती. मात्र तिने प्रसुतीच्या वेळी एका मंत्राचा जाप सुरु ठेवला. आणि तिला प्रसुती वेदना जाणवल्या नाही असं तिने या व्हिडीओमध्ये जाणवलं आहे.
‘प्रसूतीच्या वेळी माझ्या मनात गायत्री माता मंत्र चालू होता’
दिशा वाकानीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे ‘प्रसूतीच्या वेळी माझ्या मनात गायत्री माता मंत्र चालू होता. माझे डोळे बंद होते आणि मी हसत होते. अशाप्रकारे मी माझी मुलगी स्तुतीला जन्म दिला. हा एक चमत्कार होता. मी प्रत्येक गर्भवती आईला हा मंत्र जप करण्यास सांगते. यातून मिळणारी ताकद तुम्हाला आठवेल. प्रत्येकाला गायत्री मातेचा मंत्र माहित असला पाहिजे आणि आवर्जुन या मंत्राचा जप केला पाहिजे.” असा प्रसंग तिने सांगितला आहे.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, चाहते तिच्या तारक मेहता शोमध्ये परतण्याची वाट पाहत आहेत. मात्र आता दोन मुलांच्या संगोपनासाठी तिला वेळ द्यायचा आहे. त्यामुळे आता ती पुन्हा शोमध्ये दिसेल अशी शक्यता नक्कीच कमी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List