राजस्थानमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांसमोरच खुर्चीसाठी ‘दे दणादण’, पदाधिकाऱ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

राजस्थानमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांसमोरच खुर्चीसाठी ‘दे दणादण’, पदाधिकाऱ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या बैठकीदरम्यान दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. स्टेजवरील खुर्ची आणि बसण्यावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. दोघांनीही एकमेकांचे कॉलर पकडले आणि एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. भाजपमध्ये खुर्चीसाठी हाणामारी होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत भाजपला चांगलेच झोडले आहे. विशेष म्हणजे ही सर्व घटना प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्यासमोरच घडली आहे.

भाजपच्या जयपूर येथील प्रदेश कार्यालयात अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती. बैठक सुरू होण्यापूर्वीच स्टेजवर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. आघाडीच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला पण दोन्हीजण एकमेकांचे कॉलर धरून माराहाण करत होते. दोघेही आक्रमक असल्याने त्यांना वेगळे करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाची गुरुवारी बैठक होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हमीद खान मेवाती होते. या बैठकीला आघाडीच्या राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीसांनाही बोलावण्यात आले होते. बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड अल्पसंख्याक मोर्चाच्या बैठकीला पोहोचले तेव्हा पदाधिकाऱ्यांनी त्यांना स्टेजवर आणले. राठोड यांना स्टेजवर आणणारे पदाधिकारी स्टेजवरील खुर्चीवर बसू लागले तेव्हा गोंधळ सुरू झाला.

व्यासपीठावर आधीच उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी राठोड यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्याला खुर्चीवरून उठवले आणि नंतर खालच्या बाजूला धक्का दिला. त्याचवेळी स्टेजवर बसण्यासाठी दोन पदाधिकाऱ्यांची लाथा-बुक्क्यांनी मारहाण होत होती. प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्यासोमरच ही घटना घडली. दोघेही एकमेकांचे कॉलर पकडून ठोसे लागवात होते. उपस्थितांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते एकमेकांवर डोके आपटत होते. अखेर त्या दोघांना वेगळे करण्यात आले आणि दोघांनाही स्टेजवरून खाली उतरवण्यात आले.

ही हाणामारी झाली त्यावेळी भाजप मुख्यालयात बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही हाणामारीची घटना संपूर्ण घटना काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. या संपूर्ण घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हमीद खान मेवाती यांच्याकडून अहवाल मागवला आहे. तसेच, दोन्ही अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सूचना देण्यात आल्या. ही घटना सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी भाजपला चांगलेच झोडले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चल...
वनप्लस ते मोटोरोला पर्यंत! 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, राज ठाकरेंबद्दल म्हणाला…