Mahakumbh 2025 – तेव्हा माझ्याकडे ढुंकूनही बघितलंही नाही आणि आता…; महाकुंभात 36 वर्षांनी मैत्रिण भेटताच मित्राला जुन्या गोष्टी आठवल्या
मकरसंक्रांतीला म्हणजेच 13 जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीला शेवट झाला. तब्बल 144 वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभात 65 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. आपल्याला सोडून गेलेले अथवा हरवलेले लोकांची कुंभमेळ्यात भेट होते, असं आपण चित्रपटात पाहिले असेल. पण प्रत्यक्षात देखील अशीच एक घटना घडली आहे. प्रयागराजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची आणि त्याच्या मैत्रिणीची 36 वर्षांनंतर भेट झाली आहे. यानंतर त्यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, संजीव कुमार असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून रश्मि गुप्ता असे त्यांच्या मैत्रिणीचे नाव आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी संजीव यांना ड्युटी लावण्यात आली होती. रश्मीही महाकुंभमेळ्यात आल्या होत्या.
यावेळी या दोघांची अचानक भेट झाली. दरम्यान एकमोकांशी बोलत असताना दोघांनाही त्यांचे बालपणीचे दिवस आठवले. या दोघांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांनीही एकमेकांना भेटल्यानंतरच्या त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत.
फायर ऑफिसर संजीव कुमार सिंह 1988 के बाद अपनी क्लासमेट रश्मि से प्रयागराज महाकुंभ में मिले। पूरी चर्चा सुनिए
pic.twitter.com/xZqAgb6sl3
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 25, 2025
संजीव पोलीस अधिकारी असून रश्मी या लखनऊच्या महाविद्यालयात शिक्षिका आहेत. 1988 साली हे दोघेही डीग्री कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. कॉलेज संपल्यानंतर तब्बल 36 वर्षांनंतर आमची महाकुंभच्यानिमित्ताने भेट झाली आहे. अशी माहिती संजीव यांनी व्हिडीओतून दिली. यावेळी संजीवमुळे मला कुंभमेळ्यात चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या. मात्र संजीव आणि मी जेव्हा एकत्र शिकत होतो, तेव्हा हा खूप शांत होता. मात्र आता याची परस्नालिटी खूप छान झाली आहे. बऱ्याच वर्षांनी मित्राला भेटून खूप छान वाटलं, असं यावेळी रश्मी म्हणाल्या.
रश्मी यांनी केलेल्या कौतुकावर संजीव यांनी मिश्खिल उत्तर दिले. मला सांगा माणूस तारुण्यात सुंदर दिसतो की उतार वयात? आता माझे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे. आणि ही आता माझी प्रशंसा करतेय. जर हिने कॉलेजमध्ये असताना माझी प्रशंसा केली असती तर तेव्हा आमचे दिवस चांगले गेले असते. पण हिने तेव्हा मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केलं. चला तरी खूप धन्यवाद आमचं कौतुक केल्याबद्दल. हर हर गंगे…! असे संजीव यावेळी म्हणाले.
दोन मित्रांमधील संभाषणाचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List