‘सुपरमॅन’ फेम ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, घरात पत्नी आणि कुत्र्याचाही मृतदेह आढळला

‘सुपरमॅन’ फेम ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, घरात पत्नी आणि कुत्र्याचाही मृतदेह आढळला

‘बोनी अँड क्लाईड’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेले आणि दोन वेळा ऑस्करवर मोहोर उमेटवलेले अभिनेते जीन हॅकमन (वय – 95) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. न्यू मेक्सिको येथील घरामध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास Gene Hackman, त्यांची पत्नी बेट्सी (वय – 63) आणि पाळीव कुत्र्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

जीन हॅकमन यांना 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द फ्रेंज कनेक्शन’ (The French Connection) आणि 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द अनफर्गीव्हन’ (The Unforgiven) या दोन चित्रपटातील भूमिकांसाठी चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत मानाचा समाजला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. यासह चार वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन वेळा बाफ्टा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

जीन हॅकमन यांनी 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपरमॅन’ आणि 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपरमॅन 2’ चित्रपटात लेक्स लूथरची भूमिका साकारली होती. जवळपास 100 हून अधिक चित्रपटात ते झळकले होते. 2004 मध्ये ‘वेलकम टू मूसपोर्ट’ या चित्रपटामध्ये ते शेवटचे दिसले होते.

जीन हॅकमन यांचा जन्म 1930 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. जवळपास साडे चार वर्ष त्यांनी लष्करात देश सेवा दिली. पुढे त्यांनी न्यूयॉर्क येथे पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि नंतर त्यांनी कलाकार होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा कॅलिफोर्निया गाठली. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

जीन हॅकमन यांनी पहिले लग्न फेय माल्टीजशी केले. दोघांना तीन मुले झाली. क्रिस्टोफर अॅलन, एलिजाबेथ जीन आणि लेस्ली अॅन हॅकमन अशी तिघांची नावे आहेत. जीन आणि फेय या दाम्पत्याने 30 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानंतर 1986 साली काडीमोड घेतला. त्यानंतर 1996 रोजी जीन हॅकमन यांनी पियानोवादक बेस्टसी अराकावाशी लग्न केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट? रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट?
Cricket Rohit Sharma: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे मुंबईतील घर भाड्याने दिले आहे. 1,298 वर्ग फुटाचा असलेला...
कोण तू रे कोण तू… जेव्हा राज ठाकरे कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज
परवा बदलापूर, आज पुणे… शिवरायांच्या राज्यात जो न्याय….; स्वारगेट घटनेवर दिग्दर्शक संतापला
अक्रोड की बदाम… मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर काय?
मुंबई- कोकणात उन्हाचे चटके; उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल
फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम चाललंय, वैभव नाईकांचा हल्लाबोल