दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवींना हवाय नातू.. जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानाने चिरंजीवी होताहेत ट्रोल
नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला त्यांच्या नातवंडा विषयी विचारले होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला आमचे घर महिलांच्या वसतिगृहा सारखे वाटते. त्यामुळेच कुटुंबाचा वारसा पुढे चालु राहण्यासाठी एक नातू असायला हवा अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.
चिरंजीवी यांच्या या वक्तव्यानंतर मात्र ते चांगलेच ट्रोल झाले. चिरंजीवी यांचा मुलगा अभिनेता रामचरण आणि पत्नी उपासना यांना एक मुलगी आहे. कुटुंबांचा वारसा पुढे चालविण्यासाठी एक नातू असायला हवा असे विधान केल्यानंतर, चिरंजीवी आता टिकेचे धनी होताहेत.
जाहीरपणे केलेल्या या विधानामुळे चिरंजीवी आता चांगलेच अडचणीत आले आहेत. अभिनेता रामचरण आणि उपासना यांना एक मुलगी असून, पुन्हा रामचरणची पत्नी गरोदर आहे. त्यामुळेच चिरंजीवी यांच्या घरात पुन्हा एकदा नवीन पाहुणा येणार आहे. यावेळी पुन्हा एकदा मुलगी होईल की काय अशी भीतीवजा शंका चिरंजीवी यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली.
चिरंजीवी यांना दोन मुली असून, त्यांना असलेली चार नातवंडे यादेखील मुलीच आहेत. त्यामुळे आजूबाजूला महिलांची संख्या जास्त असल्यामुळे चिरंजीवी यांनी असे विधान केले. चिरंजीवींच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्या “मुलाच्या” इच्छेला पाठिंबा दिला, तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याला जुनाट आणि पितृसत्ताक विचारांचे असल्याचे म्हटले आहे. एकाने असे लिहीले की, “तुमच्या घराला मुलींचे वसतिगृह म्हणणे आणि तुमच्या मुलाला पुन्हा मुलगी होईल अशी भीती बाळगणे यावरुनच तुमची खरी ओळख पटते. काही टीकाकारांनी तर अशी विधाने लिंगभेद यांसारख्या विषयांना अधिक प्रोत्साहन देतात असेही म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List