लग्न नको रे बाबा …चीनी तरुण लग्नापासून पळताहेत दूर

 लग्न नको रे बाबा …चीनी तरुण लग्नापासून पळताहेत दूर

चीनमध्ये लग्नाचे प्रमाण घटले आहे. एकीकडे चीनमध्ये वृद्धांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे युवा तरुण विवाह करणे टाळत आहेत. भविष्यात हे संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच तरुणांनी योग्यवेळी लग्न करावे आणि अपत्यांना जन्म द्यावा, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही.

2024 मध्ये चीनमध्ये 61 लाख विवाह झाले, तर 2023 मध्ये हा आकडा 77 लाख होता. 1886 मध्ये चीनमध्ये विवाहांची नोंदणी सुरू झाली होती. तेव्हापासूनचा हा सर्वात कमी आकडा आहे.  2013मध्ये सर्वाधिक विवाहांची नोंदणी झाली होती. 2013 च्या तुलनेत 2024 मधील आकडा निम्मा आहे.

मुलांचे पालनपोषण आणि शिक्षणावरचा वाढता खर्च चीनी लोकांना परवडत नाही.  चीनच्या अर्थव्यवस्थेची घट विस्कटली आहे, त्यामुळे तरुणांना रोजगार मिळण्यात अडचणी येताहेत. ज्यांच्याकडे नोकरी आहे, ते भविष्याबाबत असुरक्षित वाटत आहेत. चीनमध्ये विवाहाचे प्रमाण वाढावे, यासाठी सरकारला पावले उचलावी लागली आहेत.

सरकार टेन्शनमध्ये

चीन जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. चीनची लोकसंख्या 140 कोटी आहे. चिनी लोक वृद्ध होत आहेत. तिथला जन्मदर घटला आहे. 30 कोटी चीनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीत लग्न, प्रेम यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा- कॉलेजमध्ये लव्ह एज्युकेशन हा विषय ठेवण्यात आलाय. जेणेकरून लग्न, प्रेम, कुटुंब, प्रजनन याबद्दल लोकांमध्ये सकारात्मकता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी? राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी?
फिल्म इंडस्ट्रीमध्ये राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटलं जातं. कारण कधी आणि कसं लाइमलाइटमध्ये यायचं हे तिला चांगलं माहीत आहे. आता...
शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…
महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते राजकारणातून हद्दपार होणार? केंद्र सरकारने मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू
स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवसेनेचा दणका, वसंत मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन
स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरण, एसटी अधिकाऱ्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश काय
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन, अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘तो’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश