राहुल गांधी, अखिलेश, केजरीवालांवर आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त जमावाची पोलीस ठाण्यात दगडफेक; सात पोलीस जखमी
कर्नाटकच्या मैसूर शहरात एका तरुणाने काँग्रेस खासदार राहुल गांधी, सपाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणी त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मात्र पोलीस त्याला लवकर सोडून देतील अशी कुणकुण लागल्याने संतप्त जमावाने उदयगिरी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या गाड्याही फोडल्या. या हल्ल्यात सात पोलीस जखमी झाले आहेत.
”आम्ही आरोपीला अटक केली. मात्र काही लोकांना ही भिती होती की आम्ही आरोपीला लवकर सोडून देऊ. त्यामुळे त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर ते हिंसक झाले व पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली”, असे पोलीस अधिकारी हितेंद्र यांनी सांगितले.,
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List