तुमच्याकडे नेलपेंटच्या ‘या’ शेडस् आहेत का? नसतील तर आजच घ्या..

तुमच्याकडे नेलपेंटच्या ‘या’ शेडस् आहेत का? नसतील तर आजच घ्या..

ग्रुमिंग हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. ग्रुमिंग मधला एक प्रकार म्हणजेच नेलपेंट. नेलपेंटची आवड लहानांपासून मोठ्यांना सर्वांना असते. अशावेळी नेलपेंटची निवड करणं हाही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. इन ट्रेंड नेलपेंटची निवड करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायला हव्यात ते आपण बघूया. 

अनेकदा नेलपेंट घेऊनही ती या ड्रेसवर जात नाही. मला चांगली दिसत नाही अशी तक्रार आपणच करत राहतो. पण इतक्या सगळ्या शेड्स घेऊन त्या वापरल्या गेल्या नाहीत तर मग आल्या तशा थेट जातात कचऱ्याच्या डब्यात कारण तो पर्यंत त्या  सुकून गेलेल्या असतात. म्हणून खास तुमच्यासाठी आम्ही अशा काही नेलपेंट शेड्स काढल्या आहेत ज्या तुमच्याकडे हव्याच. स्वच्छ, सुंदर आणि चमकदार नखांनाही मस्त नटवायचे सजवायचे असेल तर या शेडस् तुमच्याकडे हव्यात. नखांना दोन ते तीन कोट लावल्यानंतर तुमची नखे डबल किंवा ट्रिपल कोटवर उठून दिसतात.  ट्रान्सपरंट मध्ये दोन शेड्स असतात. एक थोडी पिवळ्या रंगाकडे झुकणारी असते तर एक क्रिस्टल क्लिअर असते. तुम्ही क्रिस्टल क्लिअर निवडलीत तर उत्तम. फ्रेंच मेनिक्युअर आवडणाऱ्यांकडे तर हे असायलाच हवे. कारण फ्रेंच मेनिक्युअरला साजेशी क्रिस्टल क्लिअर नेलपेंट शेड आहे. 

न्यूड रंगाची सध्या चलती आहे. कारण हा असा रंग आहे जो तुमच्या सगळ्या कपड्यांवर चालू शकतो. अगदी इंडियन पासून ते वेस्टर्न आऊटफिट सगळ्यावर. तुमच्या त्वचेचा रंग कोणताही असला तरी हा शेड् कोणालाही चांगला दिसतो. त्यामुळे तुमचा त्वचेचा रंग कोणता याचा विचार याबाबतीत करु नका. या रंगाची आणखी एक खासियत सांगायची झाली तर हा रंग तुमच्या नखांना चांगला तर दिसतो. तुमची नखे खराब झाली असतील तरीही या रंगामुळे आपली नखंही झाकून -जातात. या शेड्स मध्ये ब्रँडनुसार थोडाफार फरक पडत असेल.

लग्नाला किंवा समारंभाला जाण्यासाठी तुमच्याकडे डार्क शेडस् असणे गरजेचे आहे. डार्क शेडस् तुमच्या नखांची शोभा वाढवतात, केवळ इतकंच नाही तर डार्क शेडमुळे नखांचे सौंदर्यही वाढते. डार्क शेडस् तुम्हाला उत्तम कॅरी करता आल्या तर, डार्क शेडइतका सुंदर कोणताही पर्याय नाही. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये..” फॅनने अचानक आलियाचा हात धरला, रणबीरने सुनावलं अन् नेटकरीही संतापले “ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये..” फॅनने अचानक आलियाचा हात धरला, रणबीरने सुनावलं अन् नेटकरीही संतापले
बॉलिवूड सेलिब्रिटींना चाहत्यांमुळे अनेकदा समस्यांना तोंड द्यावं लागतं. फॅन्सबाबतचे बरेच विचित्र किस्से सेलिब्रिटींसोबत घडत असतात. असाच एक किस्सा आलियासोबतही घडला....
‘छावा’ बघून हंबरडा फोडणाऱ्या नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे..; किरण मानेंजी जोरदार टीका
Chhaava सिनेमाचा शेवटचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा, कवी कलश यांनी रचलेल्या ‘त्या’ कवीता, नक्कीच वाचा
म्हणून ‘या’ मराठी कलाकाराने नाकारली “छावा” चित्रपटातील ती भूमिका; Video होतोय प्रचंड व्हायरल
‘छावा’ सिनेमा, गणोजींच्या भूमिकेत दिसलेला सारंग साठ्ये म्हणतो, ‘लोकं मारायला निघालेत कारण…’
Pune Crime News – स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपीचा शोध सुरू
ड्रायफ्रूटस् भिजवून खा, शरीराला मिळतील खूप सारी पोषकतत्वे आणि भरपूर फायदे