अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडकून दरीत कोसळली, 55 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडकून दरीत कोसळली, 55 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडक देत दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये ही घटना घडली. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 53 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस 30 वर्षे जुनी होती. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर पुलावरून दरीत कोसळली. यात 55 जणांना प्राण आपले गमवावे लागले. दरीतून 51 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये 36 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, प्रशासनाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त बस ग्वाटेमालाच्या राजधानीच्या ईशान्येकडील प्रोग्रेसो येथून आली होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाःकार उडाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात आसखेड धरणकिनारी रिसॉर्टमध्ये धमाल पार्टीत प्रांत, तहसीलदारांचे ठुमके; जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला पुण्यात आसखेड धरणकिनारी रिसॉर्टमध्ये धमाल पार्टीत प्रांत, तहसीलदारांचे ठुमके; जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला
खेड प्रांताधिकारी, तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांनी भामा आसखेड धरणाच्या किनाऱ्यावर असलेल्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये केलेली रंगीत संगीत पार्टी, धमाल आणि डान्स...
लाडक्या बहिणीचे अनुदान बंद करता येणार नाही
इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
सीबीएसई 10 वीची परीक्षा दोन वेळा घेणार
मेट्रो बनवणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा दाढीला झटका, नगरविकास खात्याच्या अखत्यारीतील एमएमआरडीएवर लाचखोरीचा आरोप
जिंका नाहीतर बॅगा भरा! इंग्लंड-अफगाण यांच्यात आज अस्तित्वाची लढाई
आणखी एका भाषायुद्धासाठी तयार, एम. के. स्टॅलिन यांचा मोदी सरकारला इशारा