मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई, जालन्यासह 3 जिल्ह्यांतून तडीपार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह 9 जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या 9 जणांपैकी 6 जण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सक्रिय आहेत.
जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून 9 जणांना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.
अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने ही कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत.
आता रस्त्यावर लढाई करणार, 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा; मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा
कोण आहे विलास खेडकर?
विलासखेडकर हा मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा आहे. त्यांना जालना, बीड, आणि परभणी जिल्ह्यातून याला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच 1सप्टेंबर 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यासह 2023 रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणीच्या सहाय्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List