आता शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी?, राज्यातील शेतकर्‍यांना लॉटरी, निर्णय तरी काय?

आता शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी?, राज्यातील शेतकर्‍यांना लॉटरी, निर्णय तरी काय?

सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ उडाला आहे. दोनदा मुदत वाढ देऊनही शेतकऱ्यांची सोयाबीन अजून बाकी आहे. सरकाराला राज्यात सोयाबीनचा किती पेरा होता, किती उत्पादन झाले याचा काहीच थांगपत्ता नाही का? असा सवाल शेतकरी विचारत आहे. खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केली नसल्याचा आरोप होत आहे. अनेक ठिकाणी अजूनही वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. आता याप्रकरणी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

दोनदा मुदतवाढ

बारदाना नसल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला खिळ बसली होती. सोयाबीन खरेदी रखडली होती. खरेदीची मुदत 12 जानेवारी रोजी संपली होती. तर केंद्र सरकारने ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आली. ती पण संपत आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केलेली नाही.

काय घेतला निर्णय?

राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे. सर्वाधिक खरेदी लातूर जिल्ह्यातून 1 लाख 73 हजार 891 मेट्रिक टन झाली असून, त्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातून 1 लाख 32 हजार 758 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे.

इतकी सोयाबीन खरेदी

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू होती. 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत 5 लाख 11 हजार 667 शेतकर्‍यांकडून 11 लाख 21 हजार 384 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे. 14 लाख 13 हजार 269 मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट्य राज्याला दिले होते.त्या उद्दिष्टाच्या जवळजवळ 80 टक्के सोयाबीन खरेदी राज्याने केली आहे.

नोंदणी केलेल्या 7 लाख 3 हजार 194 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 11 हजार 667 शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी झाली आहे. म्हणजे नोंदणी झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 72 टक्के शेतकर्‍यांकडून सोयाबीन खरेदी झाली आहे. सर्वाधिक खरेदी लातूर जिल्ह्यातून 1 लाख 73 हजार 891 मेट्रिक टन झाली असून, त्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातून 1 लाख 32 हजार 758 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे

सोयाबीनची खरेदीसाठी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव

राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. सोयाबीन खरेदी केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या शेतकर्‍यांच्या सोयाबीन खरेदी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. 562 केंद्रावर खरेदी सोयाबीनची खरेदी करण्यात आली. 11 लाख 21 हजार 3 85 टन सोयाबीनची खरेदी झाली. पाच लाख 11 हजार 6667 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केल्याचे ते म्हणाले. सर्व गोडाऊन फुल झाल्यामुळे केंद्र शासनाकडे सोयाबीन पुन्हा खरेदी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री