बांगलादेशात मेहर अफरोजनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला घेतले ताब्यात
बांगलादेशातील अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिच्या अटकेनंतर आता आणखी एका अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले आहे. अभिनेत्री सोहाना सबा हिला गुप्तचर शाखेच्या अधिकाऱ्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सोहाना सबा हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत ढाका महानगर पोलीस उपायुक्त मुहम्मद विल्बर रहमान यांनी गुरुवारी रात्री पुष्टी केली. याआधी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मेहर अफरोज शॉन हिला ढाका येथील धनमोंडी परिसरातील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख रेजाऊल करीम मल्लिक यांनी मेहर अफरोज शॉन हिला राज्याच्या विरोधात कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. तिला चौकशीसाठी मिंटो रोडवरील गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. मात्र सोहाना सबा हिला कोणत्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी नेण्यात आले आहे याबाबत अद्याप कळलेले नाही. दोन्ही अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे.
यावेळी बांगलादेशात, मेहर अफरोज शॉनवर पहिली कारवाई करण्यात आली. आता, सोहाना सबालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर मेहरला केवळ ताब्यात घेण्यात आले नाही तर संतप्त जमावाने गावातील तिच्या घरालाही आग लावली. जमालपूर उपजिल्ह्यातील नरुंडी रेल्वे स्थानकाजवळ तिचे वडील मोहम्मद अली यांचे घर आगीत जाळून टाकण्यात आले. सोहाना सबा हे बांगलादेशच्या सिनेसृष्टीतील एक मोठे नाव आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे आणि लोकांची मनं जिंकली आहेत. सोहाना सबा ‘आयना’ आणि ‘ब्रिहोनोला’ सारख्या सिनेमांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. या भूमिकांनंतर ती बरीच चर्चेत राहिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List