बहि‍णींचे ‘लाड’ पुरवण्यासाठी सरकार भुकेलेल्यांचा घास हिरावणार; शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावणार

बहि‍णींचे ‘लाड’ पुरवण्यासाठी सरकार भुकेलेल्यांचा घास हिरावणार; शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावणार

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांची मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. कोणतेही निकष न लावता केवळ मतांसाठी आणलेल्या या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारने आता लाडक्या बहिणींचे लाड पुरवण्यासाठी भुकेलेल्यांचा घास हिरावण्याची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी आणि मिंधे सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत, असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिली आहे.

शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनेवर चालू आर्थिक वर्षात 1,300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट झाला असून शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन्ही योजनांना कात्री लावण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवभोजन थाळी योजना बंद करु नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी योजना श्रमीक, कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी सुरू केली होती. पण सरकारला आता गोरगरिबांना अन्न पुरवणे परवडत नाही. कारण आता राजकारणात त्याचा उपयोग नाही. भुजबळांनी हा विषय मांडला असून त्यांच्या मागे उभे राहू, असे राऊत म्हणाले.

शिवभोजन थाळी योजना बंद करू नये

महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला 10 रुपयात चांगले अन्न मिळते. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचे औचित्य साधत कोल्हापूरच्या पाच वर्षांच्या शिवकन्येने हिमालय पर्वत रांगेतील केदारकंठा...
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?