महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सोलापूरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा संताप

महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सोलापूरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा संताप

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर परखड शब्दात भाष्य केले. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणे हा संघाचा जुना अजेंडा आहे, अशी टीका राऊत यांनी केली. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणे हा संघाचा जुना अजेंडा आहे. ते कधी वीर सावरकरांवर घसरतील, तर कधी महात्मा गांधींवर घसरतील… आता तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर घसरायला लागले आहेत. अनेक प्रकारचे विकृत चित्रपट निर्माण करून संभाजी राजेंचे विकृत चित्रणही करण्यात आले. सरकार काय करतंय? खरे तर सरकारने चिरडून मरावे अशी परिस्थिती आहे, असा खरपूस टीकाही राऊत यांनी केली.

महापुरुषांबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्यांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे, गाडले पाहिजे. गोळ्या घातल्या पाहिजेत असा संताप, छत्रपतींचे वंशज खासदार उदयन राजे यांनी व्यक्त केला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांनी स्वत:च याची पूर्तता करावी. कोल्हापूरचे महाराज असतील किंवा सातारचे, आम्ही त्यांचे मार्गदर्शन नेहमी घेतो. आम्ही त्यांचा संताप समजू शकतो. ते राजे असून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रजा आहोत. आम्हाला अधिक तळमळ, तिडीक आहे.

दिसेल तिथे ठेचा, गाडा नाहीतर गोळ्या घाला! उदयनराजेंची उघड धमकी, सोलापूरकरच्या सुरक्षेत वाढ

यावेळी संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या विधानाचाही समाचार घेतला. आम्ही प्रयागराजला जाणार आहोत. मात्र रेडे कापायला कामाख्याला जाणार नाहीत. आम्ही श्रद्धावान हिंदू आहोत. श्रद्धेत आणि हिंदुत्वात गद्दारी, बेइमानीला स्थान नाही. महायुतीच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन सुटले असे सांगणारे लोक खुलेआम वावरत आहेत. सरकार काय करतंय? असा सवाल राऊत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप “छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 219 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या...
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?