‘अभिषेक तू खूपच नशीबवान..’; वाढदिवशी ऐश्वर्याची ती पोस्ट पाहून चाहत्यांकडून कौतुक
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. हे दोघं सोबत एकाच घरात राहत नाहीत, ऐश्वर्याचं अभिषेकशी पटत नाही, हे दोघं लवकरच घटस्फोट घेणार आहेत यांसारख्या अनेक चर्चा गेल्या काही महिन्यांपासून ऐकायला मिळाल्या. या चर्चांदरम्यान जेव्हा जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत दिसले, तेव्हा चाहत्यांनी दिलासा व्यक्त केला. बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक ही जोडी असल्याने त्यांच्या नात्याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. अशातच बुधवारी ऐश्वर्याने अभिषेकसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. ऐश्वर्याच्या या पोस्टने अवघ्या काही सेकंदांमध्ये नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आणि ती पोस्ट तुफान व्हायरल झाली. पती अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त तिने ही खास पोस्ट लिहिली होती.
अभिषेकने 5 फेब्रुवारी रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिषेकचा खास फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो अभिषेकच्या लहानपणीचा आहे. ज्यामध्ये तो छोटीशी गाडी चालवताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्याने लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला आनंद, चांगलं आरोग्य, प्रेम, देवाचा आशीर्वाद आणि सकारात्मकता सदैव मिळत राहो.’ ऐश्वर्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ऐश्वर्याचा वाढदिवस होता, तेव्हा अभिषेकने तिच्यासाठी सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. त्यामुळे आता ऐश्वर्याने अभिषेकसाठी पोस्ट लिहिल्यानंतर चाहते तिच्या स्वभावाचं कौतुक करत आहेत. ‘अभिषेक हा या पृथ्वीवरील सर्वांत नशीबवान पती आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू अभिषेक आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी खूपच चांगली आहेस’ असं दुसऱ्याने म्हटलंय.
घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक किंवा ऐश्वर्याने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं. त्यांची मुलगी आराध्या नुकतीच 13 वर्षांची झाली आहे. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला अभिषेक आणि ऐश्वर्याने वेगवेगळी एण्ट्री केल्यापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या लग्नाला अभिषेक संपूर्ण बच्चन कुटुंबीयांसह पोहोचला होता. तर ऐश्वर्या आणि आराध्या नंतर दोघीच आल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List